रस्ते अपघात कुठेही आणि केव्हाही होऊ शकतात. कधी कोणावर कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाहन चालवताना चालकांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना आपण अनेक वेळा पाहिल्या आहेत. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका चिमुकल्यानं दाखवलेल्या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

१३ वर्षाच्या मुलाने दाखवलं प्रसंगावधान –

या धक्कादायक व्हिडीओमध्ये 13 वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने त्याच्या इतर मित्रांचे प्राण वाचले आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे.ग्रेट व्हिडीओ नावाच्या ट्विटर हॅंडलवरुन हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो स्कूल बस ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला आणि बसवरील त्याचा ताबा सुटला. या दरम्यान एका १३ वर्षीय धाडसी विद्यार्थ्याने कसलाही विचार न करता बसचे स्टेअरिंग हाती घेतले आणि बस मधल्या इतर विद्यार्थ्यांचेदेखील प्राण वाचवले.यावेळी सर्व मुले घाबरतात पण स्टेअरिंग चालवणारा मुलगा शांत बस चालवतो.मग तो स्टेअरिंगवरून हात काढून ड्रायव्हरची छाती दाबू लागतो.तेवढ्यात दुसरा मुलगा जवळ येतो आणि बस थांबवतो. ही संपूर्ण घटना बसमध्ये लावलेल्या कॅमेरात कैद झाली होती.

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – अशीही कृतज्ञता ! डॉक्टरांनी केलेल्या मदतीसाठी पेशंटकडून अनोखं थँक्यू, पाहून तुम्हीही म्हणाल…

या व्हिडीओला ९५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्या मुलाचे अनेकांनी कौतुक केले आहे. सोशल मीडियावरच्या युजर्सनी त्याच्या पालकांना त्याचा अभिमान वाटत असेल असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, हा मुलगा खरा हिरो आहे, त्याने पहिल्यांदा परिस्थिती पाहिली आणि न घाबरता प्रतिक्रिया दिली, असे म्हटले आहे.