शिक्षक हे फक्त पुस्तकातील ज्ञान देणारे व्यक्ती नसतात, तर आयुष्यात मार्गदर्शन करणारी शिकवण आणि संस्कार देणारे मार्गदर्शक असतात. ते विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करतात, त्यांना विचार करण्याची क्षमता देतात आणि प्रत्येक गोष्टीतून धडा शिकवतात. अशी शिकवण विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देते आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडवते. असे शिक्षक मिळणे म्हणजे चांगले भाग्य आहे असे म्हटले जाते. चांगले शिक्षक विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, श्री राम, कृष्ण-अर्जून यांच्या गोष्टी सांगून आयुष्याची शिकवण देण्याचा प्रयत्न करतात. अशाच एक शिक्षकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, एका वर्गात एक शिक्षत विद्यार्थ्यांच्या बेंचवर बसले आहेत आणि विद्यार्थ्यांना कृष्ण-अर्जूनाची गोष्ट सांगत आहे. व्हिडीओमध्ये मुंबईतील प्रसिद्ध शिक्षक संजय अप्पन आहे ज्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाखो लोकांनी त्याला पसंती दर्शवली आहे. “हे शिक्षक कोण आहेत?? आपल्या शाळांमध्ये असे शिक्षक असते तर बरे होईल.” या कॅप्शन असलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

भगवान कृष्ण आणि अर्जुन हे भारतीय महाभारत कथेतील दोन अत्यंत प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. अर्जुन हा कुरुक्षेत्र युद्धातील महान धनुर्धर असून, त्याचे धैर्य, निष्ठा आणि धर्मनिष्ठा सर्वांनाच प्रेरणा देते. भगवान कृष्ण हे त्याचे मार्गदर्शक, मित्र आणि गुरु असून, जीवनातील कठीण प्रसंगातही बुद्धी, नीतिमत्ता आणि भक्तीचा मार्ग दाखवतात. कथा आणि उपदेश यांच्या संगमातून कृष्ण-अर्जुन यांची जोडी विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्य माणसासाठी जीवनाचे मूल्य समजून घेण्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांचे संवाद आणि निर्णय आजही मानवासाठी जीवनाचे धडे देतात. हाच प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

कृष्ण-अर्जुन कथेतून जीवनाचा धडा (Life Lesson from Krishna-Arjun Story)

व्हायरल व्हिडिओमध्ये अर्जुन भगवान कृष्णाला विचारतो की, “काही लोक इतके गरीब का आहेत की त्यांना भीक मागावी लागते?” त्यानंतर अर्जुन भिकाऱ्याला सोन्याचे काही नाणी देतो आणि म्हणतो, “हे घे, आणि भिक्षा मागू नको.” भिकारी आनंदित होतो आणि विचार करतो की, “मी गावी जाईन अन् स्वत:चे एक घर बनवेन.” पण अचानक चोर येतो आणि सोन्याची नाणी चोरून नेतो.

दुसऱ्या दिवशी पुन्हा कृष्ण आणि अर्जून यांना तोच भिकारी भीक मागताना दिसतो. तेव्हा अर्जून त्याला पुन्हा विचारतो की, तुला सोन्याची नाणी दिली तरी तू भीक का मागत आहेस? त्यावर भिकारी झालेला प्रकार सांगतो. अर्जुन पुन्हा भिकाऱ्याला एक मौल्यवान हिरा देतो. भिकारी विचार करतो की मी गावी जाईन आणि विकून भरपूर पैसे कमावेन. तो भिकारी घरी जाताच हिरा पाण्याच्या मटक्यात ठेवतो आणि शात होते पण त्याची पत्नी नेमकी तोच माठ घेऊन नदीवर पाणी आणायला जाते आणि हिरा पाण्यात वाहून जातो. तिसऱ्या दिवशी पुन्हा तो भिकारी कृष्ण आणि अर्जून यांना भीक मागताना दिसतो. शेवटी भगवान कृष्ण भिकाऱ्याला फक्त दोन छोटी नाणी देतात आणि जाण्यास सांगतो. भिकारी घरी जाताना त्याला एक मासे विक्रेता दिसतो त्याच्या टोपलीत एक मासात अत्यंत तडपडत असतो. भिकारी विचार करतो की, या दोण नाण्यांचा हा मासा विकत घेतो अन् त्याला पाण्यात सोडतो कोणाचा तरी जीव वाचेल. भिकारी जसा माशाला पाण्यात सोडतो तसा त्याच्या तोंडातून हिरा भिकाऱ्याच्या हातात येतो जे पाहून तो आनंदाने उड्या मारू लागतो. तेवढ्यात तिथून जाणारा चोर ते पाहतो. त्याला वाटले भिकाऱ्यांने त्याला ओळखले आणि त्याला पाहूनओरडत आहे त्यामुळे लोकांच्या मारा खावा लागू नये म्हणून चोर चोरलेली नाणी देखील भिकाऱ्याला देतो. हे पाहून अर्जून आश्चर्यचकीत होतो. तेव्हा कृष्ण त्याला समजावून सांगतात की, “तु जेव्हा त्याला सोन्याची नाणी दिली किंवा हिरातो स्वत:चा विचार न करता दुसऱ्याची मदत करतो. म्हणून मी त्याला मदत त्याला हरवलेले सोने आणि हिरा देऊन मदत केली.

आयुष्याचा संघर्षातील अनमोल शिकवण (Humorous Connection to Exams)

व्हिडिओच्या शेवटी शिक्षक विद्यार्थ्यांच्या परीक्षा जीवनाशी संबधीत विनोदी पद्धतीने पंच मारताना दिसतात. शिक्षक ज्या शैलीमध्ये विद्यार्थ्यांना गोष्ट सांगत आहे ती अत्यंत मजेशीर आहे जी सर्वांना आवडत आहे. संजय सर, विद्यार्थ्याची नक्कल करत म्हणतो, “संजय सर, परीक्षेत जर माझ्या मित्राला Objective प्रश्नांची कल्पना नसेल, तर मी त्याला नक्की मदत करेन, कारण त्यानंतर भगवान मला सविस्तर उत्तर देऊन मदत करतील.”

व्हायरल शिक्षक कोण? (Who is the Viral Teacher?)

हा व्हिडिओमधील शिक्षक संजय अप्पन हे मुंबईतील एक प्रख्यात शिक्षक आहेत. ते ११वी आणि १२वी महाराष्ट्र बोर्ड कॉमर्स विद्यार्थ्यांना Organization of Commerce and Management (OCM) आणि Marketing and Human Resource Management (MHRM) विषय शिकवतात. त्यांचे Instagram आणि YouTube वर लाखो लोक फॉलो करतात कारण ते गोष्ट सांगत शैलीत विषय शिकवतात.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया (Netizens Praise Storytelling Skills)

नेटिझन्सने शिक्षकांच्या कथाकथन कौशल्याचे कौतुक केले आहे. एका वापरकर्त्याने म्हटले, “तो खरोखर अद्भुत आहे. विद्यार्थ्यांना धर्म समजावून देताना त्याची पद्धत अप्रतिम आहे. मी त्याचे YouTube व्हिडिओ पाहिले आहेत, त्यात तो अनेक सुंदर कथा सांगतो आणि त्याचा संदर्भ विषयाशी जोडतो. त्याची भाषा इतकी सोपी आहे की विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा मिळते.”

दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “आपल्याला अशा शिक्षकांची गरज आहे, जे प्रेमाने विद्यार्थ्यांशी जुळतात, भयानक नियमांद्वारे नव्हे. पण आनंद आहे की असे व्हिडिओ शेअर होत आहेत. हे मुलं आणि पालकांना पारंपरिक शिक्षण पद्धतींचे महत्व समजून घेण्याची संधी देते. मानवी चेतना जलद गतीने विकसित होत आहे.”

या व्हायरल व्हिडिओमुळे पारंपरिक कथा सांगण्याच्या शिक्षण पद्धतीचे आधुनिक जगात महत्त्व पुन्हा चर्चेत आले आहे.