scorecardresearch

Viral: मासे पकडण्यासाठी मुलाने केला अप्रतिम जुगाड; आनंद्र महिंद्रांनी शेअर केला Video

या व्हिडीओला आत्तापर्यंत सोशल मीडियावर १२ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.

desi jugad video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @anandmahindra / Twitter )

महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. तो वेळोवेळी अनेक जुगाडाचे व्हिडीओ शेअर करताना दिसतो. जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. नुकताच त्याने असाच एक देसी जुगाडचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात लहान मुलाचे जुगाड तंत्र पाहून सगळेच कौतुक करत आहेत.

कसा आहे हा जुगाड?

या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाला लाकडी चौकटीत तार बांधलेले दिसत आहे. ज्याच्या मदतीने मूल काही मिनिटांत दोन मोठे मासे पकडते. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बालक प्रथम तलावाच्या काठावर एक लाकडी चौकट रचत असल्याचे दिसत आहे. यानंतर, तो मासेमारीसाठी चारा तयार करतो, जो तो काट्यावर ठेवतो आणि पाण्यात सोडतो.

(हे ही वाचा: IPL 2022: स्टेडियममध्ये मॅचदरम्यान जोडप्याने केलं ‘किस’! ट्विटरवर आला मीम्सचा पूर)

(हे ही वाचा: उद्यानात सापावर मांजरीने केला हल्ला, Viral Video ची सोशल मिडीयावर होतेय चर्चा)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत सोशल मीडियावर १२ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. त्याच वेळी, ८६ हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी याला लाइक केले आहे. प्रत्येकजण प्रभावित होत आहे आणि मुलाच्या जुगाडचे कौतुक करत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral the boy did a great jugad for fishing video shared by anand mahindra ttg