Viral: हत्तीने फिल्मी स्टाईल हत्तीणीला केलं प्रपोज, पुष्पगुच्छ देतं व्यक्त केलं प्रेम; पाहा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये एक हत्ती चक्क आपल्या मैत्रिणीला म्हणजेच हत्तीणीला गोंडस पद्धतीने प्रपोज करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Elephants proposal video
हत्तीचं प्रपोजल व्हायरल (फोटो: @Elephantsofworld / Instagram )

प्राण्यांच्या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. जर एखाद्या प्राण्याने आपल्या मैत्रिणीला प्रपोज केले तर ते दृश्य कसं असेल? हत्तीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती चक्क आपल्या मैत्रिणीला म्हणजेच हत्तीणीला गोंडस पद्धतीने प्रपोज करताना दिसत आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हत्ती आपल्या मैत्रिणीला हत्तीणीला फुलांचा गुच्छ देऊन प्रपोज करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल.. ‘अरे व्वा, ही तर एकदम फिल्मी स्टाईल आहे.’ व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की हत्तीने आपल्या प्रेयसीसाठी आपल्या सोंडेमध्ये पुष्पगुच्छ घेतले होते.

( हे ही वाचा: बाल्कनीत कपडे सुकवण्याच्या नादात वृद्ध महिला १९व्या मजल्यावरून पडली; थरारक दृश्य कैमेऱ्यात कैद )

हत्तीचं प्रपोजल व्हायरल

सोशल मीडियावर लोकांना या व्हिडीओला खूप पसंती मिळत आहे आणि हत्तीचा हा प्रस्ताव खूप ट्रेंड करत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हत्तीला प्रपोज केल्यानंतर हत्ती आपली सोंड वर करून सेलिब्रेशन करायला लागतो. हत्तीणही तिच्या प्रियकराचा प्रस्ताव आनंदाने स्वीकारते.

( हे ही वाचा: ‘या’ चार शहरात उघडणार लेडीज स्पेशल वाईन शॉप! )

( हे ही वाचा: IND vs NZ: सामना सुरु असतानाच प्रेक्षकांकडून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा!; पहा व्हिडीओ )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ ‘Elephantsofworld’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर एक लाखांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की आज हत्ती खूप आनंदी आहे आणि तो आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी त्याच्या मनाने आला आहे. त्याच्या समोर त्याची प्रेयसी येताच तो सोंडेत ठेवलेला पुष्पगुच्छ प्रेमाने आपल्या मैत्रिणीकडे देतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral the elephant proposed to the elephant in a filmy style expressed love by giving a bouquet watch the video ttg

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
ताज्या बातम्या