युट्युबच्या माध्यमातून देशात आता अनेकजण मोठ्या प्रमाणावर पैसे कमावत आहेत. युट्युबवर व्हिडीओ बनवून पैसे कमावता येतात,हे अनेकांना फार भारी वाटतं. त्यामुळे युट्युब हाच करीअर ऑप्शनही असू शकतो,असं ठरवून अनेकजण कामाला लागलेत. युट्युबर्सची संख्या गेल्या काही वर्षात लक्षणीय प्रमाणात वाढलीय. तू काय करतो असं विचारल्यावर युट्युब चॅनेल चालवतो अशी उत्तर हल्ली सर्रास मिळू लागलीयत. काही जण तर आपल्या कामासोबतच पार्ट टाईम म्हणून युट्युब चॅनेल चालवतात. अशाच एका पार्ट-टाईम युट्युबरची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे.

गोष्ट एका पार्ट टाईम युट्युबरची –

बंगळुरूमध्ये एका रस्त्याच्या कडेला कुमकुम मृधा नावाचा एक व्यक्ती ज्यूस सेंटर चालवतो आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? तर ऐका,हा ज्युस विक्रेता त्याच्या व्यावसायासोबतच पार्ट टाईम युट्युब चॅनलसुद्धा चालवतो. दरम्यान या पार्ट टाईम युट्यपबरनं असं डोक चालवलं आहे की पाहून तुम्हीही चकीत व्हाल. यानं त्याच्या स्टॉलवर दोन क्युआर कोड ठेवले आहेत. एक क्युआर कोड ऑनलाईन पेमेंटसाठी आणि दुसरा क्युआर कोड जर तुम्ही स्कॅन केला तर थेट या ज्यूसवाल्याच्या यु्टयुब चॅनेलवर जाल. म्हणजे त्याच्या स्टॉलवर जे ग्राहक ज्युस प्यायला येतात ते त्याच्या युट्युब चॅनेललाही भेट देतात. त्यामुळे त्याला सबस्क्राइब वाढायला मदत होते. त्याच्या युट्युब चॅनलचे आतापर्यंत 2 हजार सबस्क्राइबर्स सुद्धा झाले आहेत. हा पार्ट टाईम युट्युबर त्याच्या युट्युब चॅनेलवर वेगवेगळे पदार्थ बनवताना, ज्यूस बनवताना व्हिडीओ पोस्ट करत असतो.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

पाहा पोस्ट –

हेही वाचा – Google Doodle: गुगलने डूडलद्वारे दिल्या ‘नवरोझ’च्या शुभेच्छा, पारशी नववर्षाबद्दल जाणून घ्या…

केशव लोहिया या ट्विटर वापरकर्त्यानं ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानं त्याच्या स्टॉलवरील स्वच्छतेचही कौतुक केलं आहे. आपण पाहतो रस्त्याच्या कडेला असणारे विक्रेते अजिबात स्वच्छता ठेवत नाहीत मात्र हा ज्युसवाला त्याचा स्टॉल अतिशय स्वच्छ ठेवतो. या पार्ट-टाईम युट्युबरचे नेटकऱ्यांनीही कौतुक केले असून त्यानं इथून पुढेही त्याचं युट्युब चॅनेल सुरु ठेवावं असा सल्ला दिला आहे.