Viral Photo Shows mother cleaning son vomit : केरकचरा व घाणीमुळे शहराची सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्यही धोक्यात आल्याचे चित्र आहे. यासाठी स्वच्छता कर्मचारी सकाळी लवकर उठून परिसर स्वच्छ करतात आणि रस्ता, ट्रेन, स्टेशन, मैदान आदी बरीच ठिकाण स्वछ ठेवण्याच्या उद्देशाने काम करत असतात. पण, कदाचित आपणच पुढाकार घेतल्यास आपल्या परिसराची स्वच्छता व आरोग्य अबाधित राहू शकते नाही का? आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होते आहे, यामध्ये आईने लाखमोलाचा धडा शिकवला आहे.

कोलकाता मेट्रोमधून प्रवास करत असताना linkedin युजरने एक छोटीशी घटना घडली जिने एक मोठा धडा शिकवला. मेट्रोच्या डब्यात अचानक एका लहान मुलाने उलटी केली. त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, साफ करण्याचे काम इतरांवर सोपवण्याऐवजी, त्या मुलाच्या आईने लगेच स्वतःचा रुमाल वापरून ती जागा स्वच्छ केली. कोणतीही तक्रार नाही, कोणतीही लाज नाही. केवळ आणि केवळ तिला सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याच्या जबाबदारीची जाणीव तिला हे करण्यास भाग पडून गेली.

“हीच खरी चांगली सवय” (Viral Post)

त्यामुळे सर्व भारतीयांसाठी सार्वजनिक मालमत्ता ही आपलीच मालमत्ता आहे ही एक अत्यंत प्रभावी आठवण करून देणारी घटना आहे. मेट्रो असो, रस्ते असो, कार्यालये असोत किंवा कोणतीही सार्वजनिक जागा ती स्वच्छता राखणे हेच आपले कर्तव्य आहे. खरा बदल फक्त नियम किंवा सरकारच्या निर्णयांमुळे होत नाही, तो आपल्या विचारसरणीतून (mindset) सुरू होतो. जर आपल्यापैकी प्रत्येकाने या मालमत्तेची जबाबदारी स्वीकारली, तर आपला देश आपोआपच अधिक स्वच्छ आणि उत्तम बनेल ; अशी पोस्ट त्यांनी linkedin वर केली आहे.

पोस्ट पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा…

सोशल मीडियावर ही प्रत्येकाला धडा शिकवणारी घटना फ्लिपकार्टमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या पवन पाटणकर यांनी लिंक्डइनवर @Pawan Patankar या अकाउंटवरून शेअर केली आहे. पोस्ट पाहून अनेक युजर्स “चांगलं काम लपवू नका, शेअर करा. कारण ते दुसऱ्यांना बदलायला प्रेरणा देऊ शकतं”, “हीच खरी चांगली सवय, जी प्रत्येकाने शिकायला हवी”,”सामाजिक जबाबदारी म्हणजे फक्त चांगलं काम करणं नाही. तर जे योग्य आहे ते करणं आहे”, “असं खूप कमी बघायला मिळतं” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…