viral post mother remove chappal to collect cash : जीवनात संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘आजकालच्या मुलांवर चांगले संस्कार नाहीत ‘ असे अनेकदा सहज आपल्या कानावर पडते. पण, संस्कार घडले तरच संस्कृती टिकेल. त्यामुळे संस्कार मनावर रुजवावे लागतात. त्याचप्रमाणे पुढची पिढी निर्माण होते. यासाठी घरातील वातावरण चांगले ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून किंवा अगदी तुमच्या कृतीतून सुद्धा तुम्ही इतरांवर नकळत संस्कार घडवत असता. तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होते आहे.

जे जे आपल्याला भेटते, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराचे रूप पाहणे, हीच खरी भक्ती असते असे म्हणतात याच प्रात्यक्षिक एका लेकाला आईमुळे पाहायला मिळालं. इन्स्टाग्राम युजर त्याच्या आईबरोबर एटीएममध्ये गेला होता. तो फोनवर बोलण्यात गुंग होतो. त्यामुळे आईच्या हातात कार्ड देऊन त्याने तिला पैसे काढण्यास सांगितले. थोड्या वेळाने पाहिले तर काय… त्याच्या आईने एटीएमच्या बाहेर चपला काढल्या होत्या आणि अनवाणी पायाने आत जाऊन पैसे काढत होती.

शेवटी संस्कार महत्त्वाचे (Viral Photo)

त्याने तिला नकळत विचारलं, “आई, चपला का काढल्यास?” तेव्हा आई हसून म्हणाली, “अरे, पैसा म्हणजे आपली लक्ष्मी! ज्या जागेतून आपल्याला धन मिळतं, तिथे चपला घालून कसं जायचं? ते तर लक्ष्मीचं मंदिरच आहे ना!”… तिच्या या उत्तराने लेक निशब्द झाला. आपल्यासाठी जे केवळ एक ‘मशीन’ आहे, तिच्यासाठी ते ‘अन्नदात्या’ लक्ष्मीचं रूप आहे. तंत्रज्ञानाच्या या युगातही आईच्या मनातील ही शुद्ध श्रद्धा आणि कृतज्ञता पाहून खरंच खूप छान वाटलं. देव्हाऱ्यातली लक्ष्मी आणि पाकिटातली लक्ष्मी… तिच्यासाठी दोन्ही तितक्याच पवित्र आहेत आज ही गोष्ट नकळत लेकाला पाहायला मिळाली.

पोस्ट नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mohim_fatte_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी ही पोस्ट पाहून भारावून गेले आहेत आणि “एका लक्ष्मी साठी दुसऱ्या लक्ष्मीमीने पायातील चप्पल बाहेर काढून ठेवली शेवटी संस्कार महत्त्वाचे”, “एक लक्ष्मी दुसऱ्या लक्ष्मीला भेटण्यासाठी”, “फोटो मागे केवढी ती भाबडी भावना”, “शेवटची पिढी”, “कष्टाचे पैसे”, “अशी पिढी पुन्हा होणे नाही”, “पैसे नाही भावना”, “हा एक फोटो नाही तर ही एक भावना आहे”, “शेवटी ती आई आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसत आहेत…