कोण कधी सोशल मीडियावर कधी व्हायरल होईल हे कोणालाच माहीत नाही. सध्या सोशल मीडियावर एका ई-रिक्षा चालकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा ई-रिक्षावाला लोकांना सामान्य ज्ञानाशी संबंधित १५ प्रश्न विचारतो, ज्याची उत्तरे बरोबर दिल्यास त्यांच्याकडून पैसे आकारले जात नाहीत. हे तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे. हा रिक्षावाला पश्चिम बंगालमधील हावडा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

संकलन सरकार नावाच्या फेसबुक युजरने या ई-रिक्षा चालकाची कहाणी आपल्या अकाउंटवर शेअर केली आहे. फेसबुकवर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, सुरंजन अशा लोकांना मोफत प्रवास करतो, जे त्याला विचारलेल्या सामान्य ज्ञानाच्या १५ प्रश्नांची अचूक उत्तरे देतात.

(हे ही वाचा: Video : मुलीने वाढदिवसादिवशी ट्रॅक्टरवर मारली एन्ट्री, आनंद महिंद्रा म्हणाले विदेशातही आमच्याच ब्रँडचा जलवा )

पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आज मला एक अतिशय मनोरंजक व्यक्ती भेटली. आम्ही त्याच्या बॅटरी रिक्षाने रांगोळी मॉलकडे जात होतो तेव्हा अचानक त्याने आम्हाला सांगितले की तुम्ही मला विचारलेल्या १५ प्रश्नांची उत्तरे दिली तर मी तुमचे भाडे माफ करीन, हे ऐकून माझ्या पत्नीला आश्चर्य वाटले. सुरुवातीला मला वाटले की तो भाड्याने खूश नाही, आणि जर मी त्याच्या एका प्रश्नाचेही बरोबर उत्तर देऊ शकलो नाही तर त्याने जास्त भाडे मागू नये.’

( हे ही वाचा: पत्नी म्हणते ‘दाढी काढा नाही तर घटस्फोट देईल’, नवऱ्याची पोलिसांकडे धाव )

कोणते प्रश्न विचारले?

फेसबुक यूजर्स म्हणाले- रिक्षावाला अनेक प्रकारचे प्रश्न विचारतो, यावेळी त्याने श्रीदेवीच्या जन्म तारखेपासून पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीबद्दल विचारले. जन गण मन अधिनायक कोणी लिहिले? यानंतर रिक्षावाल्याने विचारले – पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

( हे ही वाचा: लग्नपत्रिकेत Marriage Act आणि संविधानाची कलमं लिहली; वकिलाची पत्रिका झाली व्हायरल! )

मधेच सोडावा लागला होता अभ्यास

स्वत:बद्दल सांगताना, ई-रिक्षा चालकाने संकल्पला सांगितले की, त्याची आर्थिक स्थिती चांगली नाही, परिणामी त्याला त्याचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पण तो रोज रात्री दोन वाजेपर्यंत जर्नल नॉलेज वाचतो. त्याने सहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.