Viral Video: ११ महिन्यांच्या बाळाचा चिकन विंग्सवर ताव; व्हिडिओ पाहून नेटीझन्सही आवाक

एका बाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Child_eat_Chicken
Viral Video: ११ महिन्यांच्या बाळाचा चिकन विंग्सवर ताव; व्हिडिओ पाहून नेटीझन्सही आवाक (Photo- Twitter Viral Video Grab)

सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी हसवणारे, तर कधी बोध देणारे व्हिडिओ नेटीझन्सची मनं जिंकतात. लहान मुलांचे व्हिडिओ नेटीझन्सचं कायम लक्ष वेधून घेत असतात. आता पुन्हा एकदा एका बाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाळाने काही मिनिटात चिकन फस्त केल्याने नेटीझन्सही आवाक झाले आहेत. ११ महिन्यांच्या बाळाने चिकनवर ताव मारत एक तुकडाही हाडावर शिल्लक ठेवलेला नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लोकप्रिय लाइस्टाइल ब्लॉगर @knightglow ने ट्विटरवर शेअर केला आहे.

व्हिडिओत दाखवलेला बाळ ११ महिन्यांचं असून त्याचं नाव इस्ले आहे. हा व्हिडिओ ट्वीट करताना ब्लॉगरने पोस्ट लिहिली आहे की, “गेल्या रात्री माझ्यापेक्षा चिकनवर त्यानेच ताव मारला आहे. मी हे पाहून आश्चर्यचकीत आहे.”

व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काही जणांनी बाळ खरंच इतकं खातं का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

१८ सेंकदाच्या क्लिपवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत २.५ मिलियन लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर हजारो लोकांनी व्हिडिओ लाईक करत शेअर केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video 11 month old baby eats chicken wings rmt

ताज्या बातम्या