scorecardresearch

VIRAL VIDEO : महिला आंघोळीसाठी जात होती अन् १२ फूट लांबीचा अजगर दिसला; पुढे जे घडले ते पाहून हादरून जाल

साप दिसला की भल्याभल्याची धांदल उडते. मग या महिलेची काय अवस्था झाली असेल?

VIRAL VIDEO : महिला आंघोळीसाठी जात होती अन् १२ फूट लांबीचा अजगर दिसला; पुढे जे घडले ते पाहून हादरून जाल
(Photo: Instagram/ nowthisnews)

साप दिसला की भल्याभल्याची धांदल उडते. सापाचं नुसतं नाव जरी काढलं तरी अंगावर काटा उभा राहतो. ज्याप्रमाणे सिंह हा पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो, त्याचप्रमाणे रांगणाऱ्या प्राण्यांमध्ये अजगर हा अतिशय खतरनाक मानला जातो. अजगर हा इतर सापांप्रमाणे विषारी नाही, तरी देखील तो सर्वात घातक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. कारण तो मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करतो. जर हाच अजगर तुमच्या घरात दिसला तर? कल्पना केली भीती वाटते. पण एका घटनेत महिला अंघोळीसाठी जात असताना अचानक बाथरूममध्ये १२ फूट लांबीचा अजगर दिसला. त्यानंतर पुढे जे घडतं ते पाहून तुम्ही थक्क व्हाल.

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुढे काय दिसत आहे, ते पाहून कुणीही हादरून जाईल. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला तिच्या बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी जात आहे. त्याचवेळी तिला बाथटबमध्ये १२ फूट लांबीचा अजगर दिसला. या अजगराला पाहून महिला घाबरून जाते. नशीब चांगलं म्हणून ती महिला काचेच्या पलीकडे होती. खोलीत असलेल्या महिलेच्या सोबत दोन मांजरी देखील आहेत.

आणखी वाचा : VIRAL : हॅलो मुख्यमंत्री साहेब! दुकानदार मला समोसाबरोबर डिश आणि चमचा देत नाही, कृपया मदत करा…

या व्हिडीओमध्ये दिसणारे दृश्य सर्वात भयानक आहे. महिलेसोबत दिसलेल्या मांजरांवर अजगराने हल्ला केल्याचे तुम्ही पाहू शकता. त्यांना गिळंकृत करण्याच्या उद्देशाने तो त्यांच्यावर हल्ला करतो. पण मांजरी देखील महिलेसोबत काचेच्या भिंतीच्या पलीकडे जातात. हा अजगर मांजरींना गिळण्यासाठी वारंवार झटतो. पण मध्येच काचेची भिंत असल्याने त्याला आपली शिकार करता येत नव्हती. कल्पना करा की जर ती काचेची भिंत नसती तर काय झालं असतं? या अजगराने मांजरींना एका सेकंदात गिळून टाकलं असंत.

आणखी वाचा : थेट घराच्या छतावर कोसळली वीज, घटनेचा VIDEO कॅमेरात कैद

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : खतरनाक! चवताळलेल्या हत्तीने भररस्त्यात कारला अडवलं आणि मग जे केलं ते पाहा…

हा व्हिडीओ nowthisnews नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ५ लाख ३२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ थायलंडमधला असल्याचं सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video 12 foot python slithers in bathroom in thailand stares at pet kittens prp