Viral Video Of 50 Year Old Man : बाईक म्हणजे मुलांसाठी जीव की प्राण. काही तरुणांना कॉलेज लाईफपासून घरच्यांकडून गिफ्ट म्हणून बाईक मिळते तर काही तरुण प्रचंड कष्ट करुन बाईक विकत घेतात. त्यामुळे बाईकशी त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं नातं तयार होतं. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये ५० वर्ष ओलांडली तरीही त्याने बाईकचे प्रेम आजवर कमी झालेलं नाही असे सांगताना एक व्हिडीओ शेअर केला आहे.
प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तीची वर्षानुवर्षे काळजी घेणे, तिची सांभाळ करणे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे जीवापाड प्रेम असणाऱ्या बाईकची सुद्धा स्वच्छता राखणे, वेळोवेळी तिला सर्व्हिसिंगला देणे महत्वाचे असते. वयाची पन्नाशी ओलांडली तरी त्यांच्या आवडीच्या कामांमधील त्यांचा उत्साह कमी झाला नाही. त्यांच्याकडे आठ वर्षे जुनी हार्ले डेव्हिडसन मोटारसायकल आहे, जी आजही नव्यासारखी चमकते.
त्याचबरोबर त्यांनी आजच्या तरुणांच्या एका सवयीवर बोट ठेवले आणि म्हंटले की, आजकालचे अनेक तरुण उत्साहाच्या भरात गाड्या तर विकत घेतात, पण त्यांची हवी तशी काळजी घेत नाहीत. दोन पिढ्यांमधील फरक दाखवत त्यांनी तरुण मुलाच्या धुळीने माखलेल्या गाडीकडे इशारा करतात. हा फक्त दोन गाड्यांमधील फरक नाही, तर तो एक धडा आहे. तुमच्याकडे असलेली वस्तू किती जुनी आहे यापेक्षा तुम्ही ती किती प्रेमाने आणि आपुलकीने त्याला जपता. हे जास्त महत्त्वाचे आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @adultsociety या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “माझ्या पॅशनला मी अजून जिवंत ठेवलंय” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “बाबापुढे कधी कोण जिंकलं आहे का”, “स्वतःच्या पैशाने बाईक घेतल्यावर सगळे जबाबदारीने बाईक घेतात”, “गाडीला गाडीच राहू द्या; तिचं भंगार करू नका” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.
