Viral video : सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कुठे काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावर लाइक्स मिळविण्यासाठी लोक इतक्या धोकादायक गोष्टी करतात की त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. याचा विचार करायला लावणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. अशा घटना याआधीही अनेकदा समोर आल्या आहेत, जिथे सेल्फी काढताना लोकांना जीव गमवावा लागला आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. यामध्ये एक तरुण अक्षरश: ट्रेनखाली चिरडला गेलाय.

रेल्वेत टवाळखोरांचा सुळसुळाट झाला आहे. अशाच टवाळखोरांची स्टंटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धावत्या रेल्वेगाडीत स्टंट करणे धोक्याचे आहे, हे सांगण्याची गरज नसते. मात्र, तरीही काही माथेफिरू धावत्या रेल्वेत स्टंट करून हकनाक आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक तरुण रेल्वेत स्टंटबाजी करताना दोन डब्यांच्यामध्ये रुळावर पडतो आणि अख्खी ट्रेन तरुणाच्या अंगावरुन जाते.

Vinod Kambli Meet Sachin Tendulkar In Cricket Coach Ramakant Achrekar Memorial Inauguration Video Viral netizens getting emotional
VIDEO: ‘अशी वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये’; इच्छा असूनही मिठी मारु शकला नाही, विनोद कांबळी-सचिनच्या भेटीत नेमकं काय घडलं?
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Young Man Exposes the Harsh Truth of a begger in Viral Video
“दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं” तरुणाने केली भिकाऱ्याची अशी पोलखोल, VIDEO व्हायरल
Shocking video during wedding grooms friends fello down fro dj truck while dancing
मित्राच्या वरातीत ट्रकवर चढून नाचणं आलं अंगलट; ब्रेक दाबला अन् अख्खा गृप तोंडावर आपटला, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Railway crossing accident when truck crushed in train track and the what happened video viral on social media
VIDEO: ‘…अन् देव मदतीला आला धावून’, अख्खी एक्सप्रेस अंगावरुन गेली पण खरचटलं सुद्धा नाही, पाहा कसा वाचला तरुणाचा जीव
Groom dance in his own haladi function with his cousins funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं स्वत:च्याच हळदीला केला तुफान डान्स; VIDEO झाला व्हायरल
Loksatta natyrang jyachi tyachi love story is Marathi drama Human Relationships entertainment news
नाट्यरंग: ज्याची त्याची लव्हस्टोरी: मानवी संबंधांची चित्रविचित्र रांगोळी

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेनच्या मधल्या अंतरामध्ये उभे राहून दोन तरुण स्टंटबाजी करत आहेत. यावेळी एक तरुण धावत्या ट्रेनमधून उडी मारतो आणि खाली उतरतो. तर दुसरा तरुण त्याच प्रयत्नात असताना त्याचा हात सरकतो आणि तो थेट रुळावर पडतो. यावेळी अख्खी ट्रेन तरुणाच्या अंगावरुन जाते. हे सगळं त्याचे मित्र पाहत असतात मात्र ते काहीच करु शकत नाहीत. डोळ्यासमोर मित्र ट्रेनखाली चिरडत होता मात्र तिथे असलेल्या तरुणाला आपल्या मित्रासाठी काहीच करता आलं नाही. थोड्यावेळी पूर्वी आपल्याबरोबर असलेल्या मित्राच्या मृत्यूचा थरार असा डोळ्यासमोर पाहण म्हणजे काय हे कुणीच सांगू शकत नाही. या व्हिडीओमध्येही मागून तरुणाच्या ओरडण्याचा आवाज येत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; ज्वेलर्सच्या दुकानात जबरी चोरी; मिनिटांमध्ये लुटलं १६ लाखांचं सोनं

 तरुणाई रील कल्चरच्या एवढ्या मोहात पडलीय की, रील बनविण्याच्या नादात अनेकांना आपल्या जीवाचीही पर्वा राहत नाही. खरे तर क्रिएटिव्हिटीला वाव देणाऱ्या या रील कलेला विकृत रूप येऊ लागलेय का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.  व्हिडीओ memes_and_roasted_video नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहलंय “फारच भयंकर” तर आणखी एकानं “काय वाटलं असले त्या मित्राला”

Story img Loader