Viral Video: “प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं”, कोण म्हणतं हे वाक्य फक्त मनुष्यांनाच लागू होतं? जोडीदारावरचं प्रेम फक्त मनुष्यांमध्येच नाही तर अनेक प्राण्यांमध्येही पाहायला मिळतं. आजपर्यंत सोशल मीडियावर तुम्ही प्राण्यांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहिले असतील, ज्यात प्राणीदेखील आपल्या जोडीदारावर मनुष्यांप्रमाणेच प्रेम करू शकतात हे तुम्हाला दिसले असेल. आताही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात एका गाईसाठी बैल असं काहीतरी करताना दिसतोय, जे पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या आजूबाजूला नेहमी विविध घटना घडत असतात. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे अनेक लहान-मोठ्या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत येतात. हे व्हिडीओ व्ह्यूज आणि लाइक्सही मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे, ज्यात एक बैल असं काहीतरी करतोय, जे पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गाईला घेऊन जाण्यासाठी एक टेम्पो मागवण्यात आला असून यावेळी गाईला थांबवण्यासाठी एक बैल टेम्पोचा पाठलाग करताना दिसत आहे. बैलाला गाईबद्दल वाटणारं प्रेम पाहून त्या गावातील लोकांनी गाईला घेऊन जाण्यापासून थांबवले आणि गाईचे आणि त्या बैलाचे लग्न लावून दिले. गाय आणि बैलाचा हा व्हायरल व्हिडीओ खूप चर्चेत आहे.

हेही वाचा: ‘अंगात नाही बळ अन् चिमटा काढून पळ…’ बैलाला लाल कपडा दाखवणं पडलं महागात… VIDEO चा शेवट पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ X (ट्विटर) वरील @me_maharashtrian या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याशिवाय या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक जण कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एकानं लिहिलंय की, “याला बोलतात प्रेम”, दुसऱ्याने लिहिलंय की, “खूप सुंदर व्हिडीओ”, तसेच इतर अनेक जण या व्हिडीओवर आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.