Viral Video: भारतीय लोक गाईला आई मानून तिची पूजा करतात. त्यामुळे गाईला गोमातादेखील म्हटलं जातं. गाय फक्त तिच्या वासरांनाच नाही, तर माणसांनाही आईसारखा जीव लावताना दिसते. काही वर्षांपूर्वी असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यात एक चिमुकला गाईच्या अवतीभोवती खेळताना दिसला होता. तसेच, गायदेखील त्या चिमुकल्याला स्वतःच्या बाळाप्रमाणे जीव लावताना दिसली होती. दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात गाय एका चिमुकलीला धडक मारून, तिच्याबरोबर असं काहीतरी करते, जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित व्हायरल झालेले व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. त्यात बऱ्याचदा प्राण्यांचेदेखील अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. प्राण्यांच्या व्हिडीओंमध्ये कधी प्राण्यांचे हिंसक रूप आपल्याला पाहायला मिळते; तर कधी आपल्याला प्राण्यांच्या गमती-जमती दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यात एक गाय एका चिमुकलीला धडक मारताना दिसत आहे.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका खांबाला बांधलेली गाय त्या चिमुकलीला जवळ घेण्यासाठी तिच्याजवळ जाऊन तिला हळूच धडक मारते आणि तिला आपल्या जिभेने कुरवाळण्याचा प्रयत्न करते. पण, गाईने धडक मारल्यामुळे चिमुकली खाली बसून मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. त्यानंतर तिचे बाबा तिला तिथून बाजूला घेतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sunehrigaay या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्युज आणि चार हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
या व्हिडीओवर कमेंट करीत एका युजरनं लिहिलंय, “अरे, गाय तिला काही करणार नाही; पण, तिला घाबरवू नका.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “लाइक्ससाठी असं करू नका.” आणखी एकानं लिहिलंय, “मुलीची काळजी घ्यायला हवी.” आणखी एकानं लिहिलंय, “घरच्यांचे लक्ष कुठे होते?”