Jungle Viral Video: सिंह हा जंगलाचा राजा आहे. तसेच तो जंगलातील सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी देखील त्याच्यापासून लांबच राहातात. तर दुसरीकडे पाण्यातील सगळ्यात खतरनाक प्राणी म्हणजे मगर असते. पाण्यात मगरीसोबत पंगा घेणं म्हणजे, स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखं आहे. कारण, जंगलात सिंह आणि पाण्यात मगरच राजा असते. पण आता चक्क मगरीशी सिहानं पंगा घेतला आहे. जेव्हा मगर आणि सिंह एकमेकांशी भिडतात तेव्हा काय होते…आता असाच या झालेल्या हल्ल्याचा व्हायरल व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

हल्ली समाजमाध्यमांवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता नाही, ज्यात अनेकदा प्राण्यांच्या व्हिडीओंचादेखील समावेश असतो. या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर कधी हेच प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. शिकारीच्या व्हिडीओंमुळे आपला नेहमीच थरकाप उडतो. शिवाय हल्ली प्राण्यांचे व्हायरल व्हिडीओही आपल्या कल्पनाशक्ती पलीकडचे असतात. खरंतर सिंह म्हटलं तर मनुष्यांव्यतिरिक्त प्राण्यांचाही थरकाप उडतो. पण, अनेकदा सिंहाचीच शिकार इतर प्राणी करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात एक मगर सिंहावर हल्ला करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलातील एका तलावामध्ये सिंह पाणी पिण्यासाठी जातो. यावेळी तळ्याच्या मधोमध गेल्यानंतर पाण्यात लपून बसलेली एक मगर सिंहावर हल्ला करण्यासाठी सावध होते. सिंह जस जसा तलावाच्या मध्यभागी जातो, तस तशी मगर त्याच्या मागे जाते आणि डाव साधून त्याच्यावर हल्ला करते.. सिंहासारख्या चपळ आणि हुशार प्राण्यावर मगरीने केलेला हल्ला पाहून नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Latestsightings या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये, “मगरीचा सिंहावर हल्ला” असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “बापरे खूपच भयानक”, दुसऱ्याने लिहिलंय की, “सिंहाची मस्ती जिरली”; तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “भयानक दृश्य”