Viral Video: श्वान आणि मांजर हे पाळीव प्राणी अनेक जण पाळतात. लोक त्यांच्या या पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम करतात, त्यांची व्यवस्थित काळजी घेतात. या पाळीव प्राण्यांना अनेकदा घरातील इतर सदस्यांपेक्षाही उत्तम वागणूक दिली जाते. त्यांची आवड-निवड पूर्ण केली जाते. अलीकडे या प्राण्यांचे वाढदिवसदेखील आवडीने साजरे केले जातात, अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात; शिवाय या लाडक्या प्राण्यांचे त्यांच्या घरातील अनेक मजेशीर व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर खूप व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील पोटधरून हसाल.

प्राणीदेखील माणसांप्रमाणेच खूप हुशार असतात. त्यांना त्यांचे आवडते पदार्थ, ओळखीचे लोक, त्यांचे आवाज लगेच ओळखता येतो. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधील एक श्वान चक्क नक्कल करताना दिसत आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील पोटधरून हसाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपल्या मालकासोबत घराबाहेर फिरायला गेलेला एक श्वान सुरुवातीला त्याच्या मालकाच्या हातातून गळ्यातील पट्टा खेचून घेतो आणि आपला तो पट्टा स्वतःच्या तोंडात पकडतो. त्यानंतर पुढे चालता चालता वाटेत चक्क श्वान कॅट वॉक सुरू करतो. बराच वेळ श्वान कॅट वॉक करतच चालतो. श्वानाचे नखरे पाहून त्याचा मालक त्याचा व्हिडीओ शूट करतो, श्वानाची ही चाल पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lovelypets422 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत तेरा हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर यावर अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

हेही वाचा: हाच प्रियकर सात जन्म… प्रेयसीने चक्क व्हिडीओ कॉलवर केली प्रियकराची पूजा; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “मुलीचं खरं प्रेम”

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीदेखील एका श्वानाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याच्या मालकिणीने चिकनचा तुकडा दाखवल्यावर तो डान्स करत होता, तर आणखी एका व्हायरल व्हिडीओमध्ये श्वान चक्क पावसात भिजण्याचा आनंद लुटत असल्याचे दिसत होते. तो व्हिडीओही खूप चर्चेत होता. तसेच आणखी एका व्हिडीओमध्ये एक मालकिण कुत्र्याला त्याच्या आगाऊपणामुळे ओरडताना दिसली होती.