Viral Video: सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ अशा अनेक गोष्टी सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनविताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘सुसेकी’ ही गाणी तुफान चर्चेत आहेत. आजही या गाण्यांवर लाखो लोक रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान, आता सोशल मीडियावर विक्की कौशलच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील ‘तौबा तौबा’ गाणं खूप चर्चेत आहे; ज्यावर ही चिमुकली ठेका धरताना दिसत आहे.

सोशल मीडियामुळे सातत्याने विविध विषयांवरील आधारित व्हिडीओंसह लहान मुलांचे अनेक व्हिडीओदेखील सतत व्हायरल होत असतात. त्यात ही लहान मुलं कधी ट्रेंडिंग गाणी, नवीन चित्रपटातील डायलॉगवर रील्स बनविताना दिसतात. हल्लीच्या लहान मुलांमध्ये सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपणही इतरांप्रमाणे आपली कला सादर करून प्रसिद्धी मिळवावी यासाठी मुलं आणि त्यांचे पालक खूप प्रयत्न करताना दिसतात. सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक जण तिच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडीओतील चिमुकली विक्की कौशलच्या चित्रपटातील ‘तौबा तौबा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Mumbai local video of some girls dancing on a marathi song Vatanyacha gol dana in mumbais local train is going viral on social Media
मुंबई लोकलमध्ये “वाटाण्याचा गोल दाणा पोरी…” गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Tourists Pull The Lions Hair And Then Watch What The King Of The Jungle Does Animal Video Goes Viral
पर्यटकांनी चक्क सिंहाच्या केसांना हात लावला; जंगलाचा राजा संतापला अन् दाखवला असा इंगा की…VIDEO पाहून थरकाप उडेल
The little girl dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, चिमुकलीने भररस्त्यात केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
Bike rider fell down on the Road while doing stunt video goes viral
“जीव एवढा स्वस्त असतो का रे?” फेमस होण्यासाठी तरुणांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
aishwarya narkar titeeksha tawde dances on kolhapuri halgi
Video : कोल्हापुरी हलगीवर ऐश्वर्या नारकर व तितीक्षा तावडे यांचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “तोड नाही…”
Farmer success story farmer old lady built bungalow worth 1 crore by selling vegetables video goes viral
“कोल्हापूरच्या आजीचा नाद नाय” भाजी विकून बांधला १ कोटीचा बंगला; VIDEO पाहून अवाक् व्हाल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली विक्की कौशलच्या चित्रपटातील ‘तौबा तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकली करीत असलेल्या डान्समधील स्टेप्स सुंदर आणि हटके आहेत. तसेच तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही लक्षवेधी आहेत. चिमुकलीचा डान्स पाहून परदेशातील लोक तिच्याकडे कौतुकाने पाहताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘जीवापेक्षा रील महत्त्वाचे…’ वाहत्या ओढ्यात तरुणाने मारली उडी; पुढे जे घडलं… VIDEO पाहून व्यक्त कराल संताप

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलेय की, खूप क्युट आहे ही. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, हिच्या चेहऱ्यावरचे हसूदेखील खूप गोड आहे. आणखी एकाने लिहिलेय की, सुपर डान्स. आणखी एकाने लिहिलेय की, डान्सची लास्ट स्टेप खूप भारी होती.