Viral video: मांजरीच्या पिल्लावर अचानक तीन वाघांनी केला हल्ला, आणि…

दुबईची राजकुमारी शेख लतीफा हिने वाघांनी वेढलेल्या मांजरीच्या पिल्लाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

kitten attacked by three tigers
व्हायरल व्हिडीओ (फोटो:@latifaalmaktoum / Instagram )

दुबईच्या शासकाची मुलगी शेखा लतीफा हिने धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये एक निष्पाप लहान मांजराचे पिल्लू चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाते आणि नंतर तीन वाघ अचानक त्याच्यावर झेपावतात आणि मग त्या मुलाने कशाप्रकारे धैर्याने त्याचा जीव वाचवला हे दाखवण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी वाघीण शेखा लतीफा (Sheikha Latifa) हिने ठेवली असून हे मांजराचे पिल्लू चुकून वाघाच्या पिंजऱ्यात गेले.

लतीफाने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की तीन वाघांनी मिळून मांजरीच्या पिल्लाला पकडण्यासाठी अचानक हल्ला केला. एक वाघ त्याला तोंडात पकडतो आणि इकडे तिकडे पळू लागतो. तेव्हा त्याला वाचवण्यासाठी दोन लोक तिथे येतात. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये त्याने सांगितले की, मांजरीच्या पिल्लाचा जीव वाचला आहे, सध्या ते पूर्णपणे बरा आहे.

( हे ही वाचा: Viral Video: आफ्रिकन सिंहाच्या अगदी जवळ पोहोचली व्यक्ती अन् … )

आम्ही तुम्हाला सांगतो की शेखा लतीफाकडे अनेक विदेशी पाळीव प्राणी असल्याची माहिती आहे. तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये, ती म्हणते की ती एक “प्राणी प्रेमी” आहे आणि तिच्या खात्यावरील बहुतेक पोस्ट पाळीव प्राणी दर्शवितात.

( हे ही वाचा: डीजे म्युझिकमुळे माझ्या ६३ कोंबड्या मेल्या; पोल्ट्री मालकाच्या तक्रारीमुळे पोलीसही चक्रावले )

(हे ही वाचा: …अन् लग्नाचा लेहेंगा घालूनचं वधू पोहचली परीक्षा केंद्रावर; व्हिडीओ व्हारल )

त्याचबरोबर व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स इन्स्टाग्रामवर अनेक कमेंट करत आहेत. लोक मांजरीच्या शौर्याचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले – वाचवल्याबद्दल धन्यवाद. दुसर्‍याने लिहिले – मांजरीच्या पिल्लाने वाघाचा धैर्याने सामना केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video a kitten is suddenly attacked by three tigers and ttg