Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावरील ट्रेंड सतत विविध गोष्टींमुळे बदलत असतो. कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ, तर कधी आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ सातत्याने आपल्या डोळ्यांसमोर येतात. बऱ्याचदा यावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात नकळत घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एका गार्डनमध्ये भला मोठा अजगर पाहायला मिळतोय.
विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. साप, नाग, अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही. अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ, फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी जंगलातील एका अजगराचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात त्या अजगराला पाहून वाघ घाबरल्याचे दिसत होते. दरम्यान, आता या व्हिडीओनंतर आणखी एक धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका भल्या मोठ्या अजगराला पकडल्याचे पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी प्रचंड व्हायरल होतात, ज्यात अगदी माणसांपासून ते प्राण्यांपर्यंतचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते, तर काही व्हिडीओंमुळे आपल्या अंगावर काटा येतो. आता असाच आणखी एक व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ नवी मुंबईच्या कौपरखैरणेमधील सेक्टर २१ च्या निसर्ग उद्यानातील आहे. या निसर्ग उद्यानात दररोज सकाळी आणि संध्याकाळी अनेक लोक, लहान मुलं येत असतात. या उद्यानातील रस्त्याच्या कडेला असलेला एका पिंपळाच्या झाडावर भला मोठा अजगर बसल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. यावेळी लोकांनी तत्काळ सर्पमित्राला बोलावले आणि अजगराला पकडले. झाडावर बसलेल्या भल्या मोठ्या अजगराला खाली उतरवणं इतकं सोप्प नव्हतं. यावेळी अग्निशामक दलाच्या मदतीने सर्पमित्राने अजगराला खाली आणले. हा व्हिडीओ पाहताना अक्षरशः अंगावर काटा येत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sameer_patel_4444 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “अंगावर काटा आला”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “बापरे खूपच भयानक”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “दादा तू ग्रेट”, तर आणखी एकाने लिहिलंय की, किती “भयानक आहे हे”
