Viral Video: सोशल मीडियावर नेहमी विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बिबट्याने तरस प्राण्याची शिकार केल्याचे दिसत असून तो या प्राण्याला जबड्यातून घेऊन जाताना दिसत आहे. पण, यावेळी असं काहीतरी होतं जे पाहून युजर्स अनेक कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ज्याप्रमाणे मनुष्य अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजांसाठी आयुष्यभर कष्ट करतो, त्याचप्रमाणे निसर्ग नियमानुसार प्रत्येक जीव आयुष्यभर आपली भूक भागवण्याच्या शोधात असतो. अनेकदा जंगलातील प्राणी करत असलेली शिकार पाहून लोक त्यांच्या हिंसक वृत्तीवर चर्चा करतात, पण शेवटी त्यांनादेखील जगण्यासाठी इतर प्राण्यांची शिकार करणे गरजेचे असते. सोशल मीडियामुळे अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री पाहायला मिळते. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)

हा व्हायरल व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्कमधील असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलामध्ये एक बिबट्या तरस प्राण्याची शिकार करून त्याला जबड्यामध्ये घेऊन एका झाडाजवळ येतो. यावेळी बिबट्या त्याची शिकार घेऊन झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो, पण अनेक प्रयत्न करूनही बिबट्याला शिकार घेऊन झाडावर चढता येत नाही. त्यावेळी पर्याय म्हणून बिबट्या झाडाखाली उभा राहून तरस प्राण्याला खातो. बिबट्याची ही हुशारी पाहून युजर्स त्याच्या चातुर्याचे कौतुक करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Latest Sightings या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास सात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून एक हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

हेही वाचा: सिंहाला आली झोप… कारमध्ये बसून देतोय आळस; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केल्या मजेशीर कमेंट्स

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत (Viral Video Comments)

एका युजरने लिहिलंय की, “अन्न हे अन्न आहे, परंतु बिबट्याने तरस प्राण्याची शिकार कशी केली ही कथा जाणून घेणे खूप मनोरंजक असेल”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “बिबट्या काहीही खाईल. बीटलपासून वाइल्डबीस्टपर्यंत तो कोणत्याही प्राण्यावर मात करू शकतो”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “हा व्हिडीओ एवढा लहान का आहे?”, तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “तरस प्राणी तितका चवदार नसेल.”