Viral Video: या जगात मनुष्यांपासून पशू-पक्षांपर्यंत प्रत्येक जण संघर्षमय आयुष्य जगत असतो. मनुष्य आपल्या आयुष्यातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र झटतात. त्याचप्रमाणे प्राणी, पक्षीदेखील त्यांच्या आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी काहीना काही करताना दिसतात. प्राण्यांच्या आयुष्यातील अनेक न पाहिलेल्या गोष्टी जंगलातील व्हिडीओंमुळे पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक बिबट्या आपली भूक भागवण्यासाठी मोठ्या हुशारीने शिकार करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जंगलातील अनेक व्हायरल व्हिडीओमध्ये कधी बिबट्या, वाघ, सिंह या प्राण्यांना तुम्ही इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिले असेल. या प्राण्यांव्यतिरिक्त तळ्यातील मगरही पाणी पिण्यासाठी गेलेल्या प्राण्यांवर हल्ला करते. आजपर्यंत मगरीच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ तुमच्या नजरेस पडले असतील. पण, आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मगरीची शिकार झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलातील एका तळ्यामध्ये मगर तिने केलेल्या शिकारीचा आस्वाद घेत असून इतक्यात तळ्याशेजारी असलेल्या झाडीतून एक बिबट्या वेगाने धावत येतो आणि मगरीवर झडप घालून तिला घेऊन जातो. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने “आयुष्यात नेहमी सतर्क राहायला हवं” असं लिहिलं आहे.

हेही वाचा: ‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘खेतों में तू आई नहीं’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @jansamparknews या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाल्या असून यावर अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.