Viral Video: समाजमाध्यमांमुळे नेहमीच विविध गोष्टी आपल्या नजरेस पडतात, ज्यात अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर काही प्राणी एकमेकांशी भांडताना दिसतात किंवा एकमेकांसोबत खेळताना दिसतात. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील काही क्षण चकित व्हाल.

माणसांच्या आयुष्यात जसा जगण्यासाठी संघर्ष सुरू असतो, तसाच संघर्ष प्राण्यांच्या आयुष्यातही पाहायला मिळतो. जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. यासाठी ते वापरत असलेले डावपेच आपल्या काळजाचा ठोका चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक सिंह वाइल्डबीस्टवर प्राण्याच्या कळपावर हल्ला करताना दिसत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घनदाट जंगलामध्ये वाइल्डबीस्ट प्राण्याचा कळप जात असून यावेळी सिंह कळपावर हल्ला करण्यासाठी वेगाने धावतो आणि त्यातील एका प्राण्यावर हल्ला करतो. यावेळी हल्ला करता करता सिंह आणि तो प्राणी डोंगराळ जागेतून खाली घसरतात, पण तरीही सिंह आपली शिकार सोडत नाही. तो त्या प्राण्याच्या मानेला आपल्या जबड्यात पकडून खाण्याचा प्रयत्न करतो. जंगलातील या धरारक घटनेचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: नाद खुळा पोरी… ‘मदनमंजिरी’ गाण्यावर चिमुकलीने केली भन्नाट लावणी; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @thedreamsmpserver8373 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत पन्नास लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर युजर्सदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

Story img Loader