Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यात काही व्हिडीओंमध्ये प्राण्यांचे मजेशीर, तर कधी थरारक व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. अनेकदा या व्हिडीओंमध्ये प्राण्यांसह काही व्यक्तीदेखील मजा-मस्ती करताना दिसतात; पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असं काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

कुत्रा हा अनेकांचा आवडता प्राणी आहे. या पाळीव प्राण्यावर लोकांचे जीवापाड प्रेम असते. कुत्र्याला घरातील सदस्याएवढीच चांगली वागणूक दिली जाते. काही जण फक्त घरातीलच कुत्र्यांनाच नाही, तर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनाही खूप जीव लावतात. त्यांना खाऊ-पिऊ घालतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही एक व्यक्ती असंच काहीतरी करते; पण त्यावेळी त्याच्याबरोबर असं काही होतं, जे पाहून तुमचा थरकाप उडेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्यावरील भटक्या कुत्र्याला कुरवाळत आहे. यावेळी तो कुत्राही व्यक्तीला चांगला प्रतिसाद देतो. त्या व्यक्तीच्या पोटावर दोन्ही पाय लावून उभा राहतो. मात्र, अचानक कुत्रा त्या व्यक्तीला चावा घेण्यासाठी त्याच्या अंगावर धावून येतो. कुत्र्याची ही थरारक कृती पाहून व्यक्ती त्याला दूर ढकलते. वेळेवर ती व्यक्ती सावध झाल्यामुळे त्याला फारशी दुखापत झाली नाही.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @wtf.batshonline या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: “आईसाठी तरी हे नको…” तरुणाने प्रसिद्धीसाठी केला जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “माझा बीपी वाढला हे पाहून.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा कुत्रा तर माणसांसारखा निघाला.” आणखी एकाने लिहिलेय, “हा रागावला तुझ्यावर.” हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याचे म्हणत आहेत.