सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या कामाचा खूप आनंद घेताना दिसत आहे. वास्तविक हा व्हिडीओ लोकांना आवडण्याचं कारण म्हणजे ती व्यक्ती आपलं काम आवडीने पूर्ण करताना दिसत आहे.

सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हिडीओ आयपीएस अधिकाऱ्याने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले की, “कामही करा, मजाही करा.” या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हातगाडीवर असलेल्या गोण्यावरून कोलांटी उडी मारतो आणि यात तो आपल्या दोन्ही हातांनी गोणी पाठीवर घेताना दिसतोय. गोणी आपल्या पाठीवर घेण्याची ही अनोखी स्टाईल नेटकऱ्यांना खूपच आवडली आहे. काम कर काम पण सोबत मजा मस्ती करण्याचा आनंदही हा गडी लुटताना दिसतोय.

Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच

या कामगाराची गोणी खांद्यावर घेण्याची ही स्टाईल पाहून हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. गोणी खांद्यावर उचलून घेण्यासाठी ही भन्नाट आयडिया पाहून सारेच जण हैराण होत आहेत. हा व्हिडीओ पाहून काही जणांना हसू आवरत नाही. तर काही जणांनी या कामगाराच्या स्टाईलचं कौतूक केलंय.

आणखी वाचा : Lucky Boy! VIRAL VIDEO ने मालामल झाला हा ‘Paragliding Man’…; आज लाखोंमध्ये कमवतोय!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : तुम्ही कधी ‘कुकर कॉफी’ घेतली आहे का?; रस्त्यावरील विक्रेत्याचा VIDEO VIRAL एकदा पाहाच…

या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडू लागलाय. तर अनेकांनी या व्हिडीओला लाईक करत इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं की, जर आपण हवं असेल तर कठीण कामही अगदी मजेशीर पद्धतीने करू शकतो.” लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेत आहेत. मात्र हा व्हिडीओ पाहून एकच म्हणावं लागेल, काम करा पण स्टाईलमध्ये…!