Viral Video: समाजमाध्यमांवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही, यातील काही व्हिडीओंमुळे आपल्या चेहऱ्यावर हसू येतं; तर काही व्हिडीओंमुळे आपल्या काळजाचा थरकाप उडतो. सोशल मीडियावर बऱ्याचदा प्राण्यांचेही अनेक विविध प्रकारचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, ज्यामध्ये अनेकदा काही प्राणी एकमेकांशी भांडण करताना दिसतात, तर काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात दोन तरुणींबरोबर असं काहीतरी करतोय जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
अनेकांना प्राणी खूप प्रिय असतात. पण, तेच प्राणी त्यांच्याबरोबर कधी काय करतील हे सांगता येत नाही. माणसांनी कितीही जीव लावला तरी बऱ्यचदा प्राणी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय ज्यात एक माकड दोन तरुणांच्या डोक्यावर बसलेले दिसत आहे.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरूणी राजस्थानातील जयपूरमध्ये फिरायला गेल्या असून यावेळी एका किल्ल्यावर फिरत असताना त्यांच्यासमोर एक माकड येते आणि अचानक ते त्या दोघींच्या डोक्यावर बसते. यावेळी सुरूवातीला ते दोघींपैकी एकीच्या डोक्यावर काहीतरी तपासून बघते. त्यानंतर ते दुसऱ्या तरूणीच्या डोक्यातही काहीतरी तपासते.यावेळी त्या दोन्ही तरूणी मोठमोठ्याने हसतात. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @surajsahu4554 या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्यूज आणि लाखो लाईक्स मिळाल्या आहेत, यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘अरे देवा हे काय?’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘डोक्यातल्या उवा मारूनच जाणार तो’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘बापरे खूपच खतरनाक’ तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘ताई सांभाळून, काही माकडं खूप भयानक असतात.’
