Viral Video: हल्लीची पिढी गड-किल्ल्यांवर जाण्यास विशेष पसंती देताना दिसते. इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाशी जोडलेल्या या किल्ल्यांना भेट देण्याची तरुणांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. सोशल मीडियामुळेही गड-किल्ल्यांचे फोटो, व्हिडीओ आणि ट्रेकिंगचे अनुभव मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असल्याने नव्या पिढीला या ऐतिहासिक ठिकाणांविषयी आकर्षण निर्माण होत आहे. मित्र-मैत्रिणींचे ग्रुप, कुटुंबीय किंवा ट्रेकिंग ग्रुपसोबत किल्ले सर करण्याचा आनंद घेताना अनेक तरुण दिसतात. त्यामुळे पर्यटनासोबतच इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा सुंदर संगम नव्या पिढीला अनुभवता येत आहे.

गड-किल्ल्यांवर माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. पर्यटकांच्या हातातील खाद्यपदार्थ किंवा वस्तू पाहून काही माकडे त्यांच्याजवळ येतात आणि कधी कधी वस्तू हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. तर कधी लोकांच्या अंगावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पर्यटकांना माकडांपासून सावध राहावे लागते. दरम्यान, आता एका किल्ल्यावर अशीच घटना घडल्याचे पाहायला मिळत आहे.

माकड हा अत्यंत हुशार आणि माणसांच्या हालचालींचे अनुकरण करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे माकडांचे मजेशीर, खोडकर किंवा वेगवेगळ्या हालचाली करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यांच्या अनोख्या कृती पाहून नेटकऱ्यांचेही लक्ष वेधले जाते आणि काही व्हिडीओंवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया पाहायला मिळतात.

हरिहर किल्ल्याच्या डोंगरावरील अरुंद आणि दगडी पायऱ्यांवर काही गडप्रेमी चढाई करत असताना अचानक एक माकड तिथे येते आणि थेट एका तरुणीच्या अंगावर जाऊन बसते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणीसह आजूबाजूला असलेले गडप्रेमीही काही क्षणांसाठी घाबरतात. मात्र, यावेळी एका व्यक्तीने सर्वांना घाबरू नका आणि शांत राहा, असा सल्ला दिला. त्यानंतर आसपासचे सर्वजण शांतपणे उभे राहतात. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Amol Telang (@amoltelang4633)

हा व्हिडीओ युट्यूबवरील @amoltelang4633 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “बापरे, खूपच भयानक” एका युजरने लिहिलेय, “अंगावर काटा आणणारा क्षण” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूपच भयानक दृश्य”