scorecardresearch

गच्च भरलेल्या बसमध्ये विद्यार्थ्याला गेटवर लटकून करावा लागत होता प्रवास, अचानक हात सुटला आणि…; पाहा धक्कादायक VIDEO

व्हायरल होणारा हा व्हिडीओ अतिशय धक्कादायक आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा ठोक चुकेल.

गच्च भरलेल्या बसमध्ये विद्यार्थ्याला गेटवर लटकून करावा लागत होता प्रवास, अचानक हात सुटला आणि…; पाहा धक्कादायक VIDEO
व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा ठोक चुकेल. (Twitter)

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. हा व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये एक शाळकरी मुलगा बसमधून पडताना दिसत आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की ही बस गच्च भरलेली आहे, त्यामुळे काही लोकांना बसच्या गेटवर लटकून प्रवास करावा लागत आहे.

इंटरनेटवर वेगाने व्हायरल होणार हा व्हिडीओ तामिळनाडूमधील असल्याचा म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये गर्दीने भरलेल्या तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या (TNSTC) बसमध्ये चढलेला एक शाळकरी मुलगा अचानक चालत्या बसमधून रस्त्यावर पडताना दिसतो. यानंतर हा मुलगा उठून उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे.

बसमध्ये जास्त प्रवासी असल्यामुळे ही बस गच्च भरलेली आहे आणि प्रवासी बसच्या दारापर्यंत लटकत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळेच ही बस डावीकडे झुकल्याचे दिसते. यानंतर काही वेळातच दारावर लटकलेला मुलगा हात सुटल्यामुळे रस्त्यावर पडतो. व्हायरल होणारा हा व्हिडीओ अतिशय धक्कादायक आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा ठोक चुकेल.

Viral Video : आगीशी खेळ पडला महागात; गणेशोत्सवादरम्यान स्टंट करताना त्याने स्वतःलाच घेतलं पेटवून अन्…

@ASenthi12447593 या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहणारे युजर्स या अपघाताबद्दल चिंता व्यक्त करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याच वेळी, काही वापरकर्ते या अपघातासाठी बस चालक आणि तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या