जगभरात सध्या अनेक टेक्नॉलॉजी उदयाला येत आहेत. बाजारात रोज नवनवीन गाड्या देखील येत आहेत. त्यामध्ये काही पेट्रोल-डिझेल तर काही चार्जिंगवरील आहेत. दुनिया जरी टेक्नाॉलॉजीच्या बाबतीत पुढे जात असली तरी देखील अनेक लोकं त्यांच्या स्वत:च्या बुद्धीने काही तरी नवीन उपकरणं तयार करत असतात. त्याबाबतीत आपल्या देशातील लोकं आघाडीवर असतात त्यांना आपण जुगाडू असं देखील म्हणतो. तुम्हीदेखील अशा जुगाडू लोकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील मुलाने एक गाडी तयार केली असून ती गाडी केवळ १० रुपयाच्या खर्चामध्ये तब्बल १५० किमी धावत असल्याचा दावा देखील गाडी बनविणाऱ्या मुलाने केला आहे. शिवाय या मुलाच्या देशी जुगाडाचा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील त्याचे चाहते व्हाल, एवढी भन्नाट चार्जिंगवर धावणारी गाडी त्या मुलाने बनवली आहे.

या मुलाने बनवलेल्या गाडीसाठी १० ते १२ हजार खर्च आला असून सायकलवर एकावेळी जवळपास ६ लोक बसू शकतात. महत्वाची बाब म्हणजे ही गाडी एकदा चार्ज करण्यासाठी केवळ ८ ते १० रुपये खर्च येतो. मात्र, सायकल एकदा चार्ज केल्यानंतर ती सुमारे १५० किलोमीटरपर्यंत घेऊन जाता येते. सोशल मीडियावरील या मुलाचे हे देशी जुगाड लोकांना खूप आवडलं आहे.

हेही पाहा- Viral Video: हजारो लोकांसमोर लाइव्ह सूरु असताना कोरियन महिलेची मुंबईत छेडछाड, बळजबरीने जवळ ओढलं अन्…

शिवाय काहीजणांचा तर त्याने बनवलेल्या गाडीवर विश्वास देखील बसत नसल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे. शिवाय अशी गाडी बनवली असेल तर ही खूपच फायदेशीर असून अनेक लोकांना याचा फायदा होईल असं नेटकरी म्हणत आहे. दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ ‘asadabdullah62’ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तो तब्बल २ कोटी २० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर ८ लाखांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. या देशी जुगाडाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video a unique car made by a child will run 150 km for rs 10 jap
First published on: 01-12-2022 at 16:13 IST