Viral Video: सोशल मीडियामुळे घरबसल्या आपल्याला अनेक लोकांच्या विविध कला पाहायला मिळतात. तसेच कलाकारांनाही आपली कला मोठ्या प्रेक्षकवर्गासमोर सादर करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कलाकारांनाही आपल्या कलागुणांना वाव देण्याची आणि त्यांची कला जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत आहे.

या सोशल मीडियामुळे मागील काही वर्षांत अनेक कलाकार घडले आहेत. पूर्वी आपली कला मोजक्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकारांना विविध कार्यक्रम किंवा व्यासपीठांची गरज असायची. मात्र, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या आपली कला सादर करून ती लाखो लोकांपर्यंत पोहोचवता येते. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच सामान्य कुटुंबातील अनेक कलाकारांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली आहे. एखादा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक कलाकारांना मोठी ओळख मिळते आणि त्यांच्या कलेचे कौतुकही केले जाते.

अनेक खेडेगावांतील गृहिणींचे आयुष्य चूल-मूल आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांभोवतीच फिरत असते. घरातील कामे, कुटुंबाची काळजी आणि दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांच्या अंगी असलेली कला, कौशल्य आणि प्रतिभा अनेकदा घराच्या चौकटीपलीकडे पोहोचत नाही. त्यामुळे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधी त्यांना फारशी मिळत नाही. मात्र, सोशल मीडियामुळे या परिस्थितीत हळूहळू बदल होत असून अनेक गृहिणींना आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळत आहे.

अनेक गावांमध्ये महिलांसाठी मनोरंजनाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी गाणी, नृत्य, खेळ, उखाणे, भजन तसेच विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामुळे महिलांना दैनंदिन कामाच्या व्यापातून काही काळ निवांतपणे आनंद घेता येतो आणि गावातील इतर महिलांशी संवाद साधण्याची संधीही मिळते.

आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, त्यांच्यामध्ये बसलेल्या एका महिलेला माईक देण्यात येतो. यावेळी या महिलेने ‘माझा सोन्याचा संसार’ हे गाणे अतिशय सुंदर आणि सुरेल आवाजात गायले. महिलेचा आवाज ऐकून उपस्थित महिलांनीही तिचे कौतुक केले. या महिलेच्या अंगी असलेली गायनाची कला सोशल मीडियामुळे अनेकांपर्यंत पोहोचत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @amrutchavan_official या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “दुसऱ्याला सुखी ठेवण्यासाठी आपली कला दाबून ठेवावी लागते तायडे खूप छान आवाज आहे तुझा” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “अप्रतिम आवाज अन् तुमचा असाच सोन्याचा संसार असूद्या” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “संसाराच्या जबाबदारी पडल्यामुळे आपल्या कलांना स्वप्नांना बाजूला ठेवून आपला संसार प्रथम म्हणणाऱ्याच्या माझ्या माय माऊलीच्या आवाजाला सलाम” आणखी एकाने लिहिलेय,, “म्हणून तर कला ही नेहमी गरिबाच्याच पोटी जन्माला येते ”