Viral Video: हल्ली लोक फॅशनच्या नावाखाली काय काय करतीय हे सांगता येत नाही. कपडे, मेकअप, केसांच्या स्टाईलवरून नेहमीच मुलींना ट्रोल केले जाते. या कारणावरून बऱ्याचदा वाददेखील उद्भवतात. पण, आता मुलंदेखील फॅशनच्या बाबतीत मागे नाहीत. अनेक तरुण केस कापण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करताना दिसतात. ज्यात कधी केसांवर खेळाडूंचे चित्र काढतात, तर कधी केसांना हिरवा, निळा, गुलाबी असे रंगही लावतात, जे पाहायला खूप विचित्र दिसतात. मुलांच्या या केसांवरून अनेकदा त्यांना ट्रोलही केले जाते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात फायर कटिंग करताना असे काहीतरी झाले जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

समाजमाध्यमांवर नेहमीच नवनवीन व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो, ज्यात काही लोक स्वतःच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी व्हिडीओच्या माध्यामातून शेअर करतात. ज्यात अगदी शॉपिंगपासून ते घरी जेवण काय बनवणार इथपर्यंत सर्व गोष्टींची माहिती देतात. अनेक जण हेअर कटिंग करतानादेखील असे व्हिडीओ शूट करणं पसंत करतात. या व्हायरल व्हिडीओतील तरुणालादेखील फायर कटिंग करायचे होते, त्यासाठी त्याने कॅमेरा सेट करून ठेवला. पण, पुढे जे घडले ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण सलूनमध्ये फायर कटिंग करण्यासाठी खुर्चीवर बसलेला दिसत आहे. त्यावेळी केस कापणारी व्यक्ती तरुणाच्या केसांना एक जेल लावते आणि केसांना माचिसच्या काठीने आग लावते. पण, अचानक भलतंच काहीतरी घडतं. लावलेली आग केसांसोबतच त्या तरुणाच्या मानेला आणि संपूर्ण डोक्याला लागते. हे पाहून तो तरुण घाबरून खुर्चीवरून उभा राहतो, केस कापणारी व्यक्ती लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात सलूनमधील उपस्थित इतर लोकही आग विझवण्याचा प्रयत्न करतात. काहीवेळाने आग विझवण्यात यश मिळते. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘गुलाबी साडी’ गाण्याची शिक्षकालाही भुरळ; भरवर्गात विद्यार्थ्यांसोबत केला जबरदस्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी करतायत एक्स्प्रेशन्सचे कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @Vijay या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये आणखी करा फायर कटिंग असे लिहिले आहे. आतापर्यंत या व्हिडीओला नऊ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून हजारोंमध्ये लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. ज्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “ही मुलं असं का करतात?”, तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “हा व्हिडीओ पाहून मला खूप आनंद होत आहे”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “अरे देवा, हे काय झालं”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “फायर कटिंग करणाऱ्यांवर बंदी घातली पाहिजे.”