Viral Video: विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. साप, नाग, अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही. अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ, फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी जंगलातील दोन विषारी नागांचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात ते दोन्ही नाग एकमेकांबरोबर भांडण करताना दिसत होते. दरम्यान, आता या व्हिडीओनंतर आणखी एक धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका भल्या मोठ्या नागाला तरूणी रेस्क्यू करताना दिसतेय.
सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी प्रचंड व्हायरल होतात, ज्यात अगदी माणसांपासून ते प्राण्यांपर्यंतचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते, तर काही व्हिडीओंमुळे आपल्या अंगावर काटा येतो. आता असाच आणखी एक व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गावामध्ये भला मोठा नाग दिसला असून या नागाला रेस्क्यू करण्यासाठी एक तरूणी तिथे येते आणि मोठ्या चपळतेने आणि संयमाने नागाची शेपटी पकडते. यावेळी नाग तरूणीवर हल्ला करण्याचा प्रयत्नही करतो परंतु शेवटी तरूणी त्याला जंगलापर्यंत घेऊन जाते आणि त्याला सोडून देते.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @saiba__19 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “अंगावर काटा आला”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “बापरे किती भयानक”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “ताई तू ग्रेट”
