Viral Video: सोशल मीडियाचा वापर जितका चांगला त्याहून अधिक त्याचे गंभीर दुष्परिणामदेखील आहेत. अनेकदा आपल्यासमोर असे व्हिडीओ येतात, ज्यामध्ये काही लोक विनाकारण केवळ प्रसिद्धीसाठी आणि दिखावा करण्यासाठी सोशल मीडियावर जीवघेणे प्रयोग करत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात काही तरुणांना इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये अपघात झाल्याचे दिसत आहे.

लोकांना नेहमीच सोशल मीडियाच्या आभासी जगात वावरायला आवडतं. ज्यात काही जण इतरांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन व्हिडीओ, रिल्स तयार करतात. पण, हे व्हिडीओ कधी कधी इतके जीवघेणे ठरतात ज्याची आपण कधी कल्पनादेखील करू शकत नाही. सध्या चर्चेत असलेला हा अपघातदेखील असाच भयानक आहे.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Jalgaon Accident major accident car hit man
VIDEO: जळगांवच्या रस्त्यावर रात्री १२चा थरार; डॉक्टरांच्या आयुष्याचा असा झाला शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO

२ मे रोजी रात्री ३.३० ते ४.३० च्या सुमारास अहमदाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या एका कारमध्ये २२ ते २७ वयोगटातील पाच तरुण प्रवास करत होते. यावेळी त्यांनी गाडीमध्ये मोठमोठ्यानी गाणी लावली, शिवाय ते प्रवासाचा आनंद घेत इन्स्टाग्राम लाइव्हदेखील करत होते. यावेळी लाइव्ह करणारा तरुण सांगतो, बघा मित्रांनो गाडी कशी धावतेय, गाडीतील दुसरा तरुण म्हणतो, हो १४० किमी प्रतितास वेगाने जातेय; तेवढ्यात ड्रायव्हिंग करणारा तरुण गाडीचा वेग आणखी वाढवतो आणि समोरून जाणाऱ्या एका मोठ्या गाडीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पण, तेवढ्यात त्याचे नियंत्रण सुटते आणि अचानक गाडीचा अपघात होतो. हा झालेला अपघात तरुणाच्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये दिसत असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या अपघातात पाचपैकी चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी आहे.

हा व्हायरल व्हिडीओ X (ट्विटर) वरील @Prateek Singh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्यक्तीने या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये माहितीदेखील शेअर केली आहे. ज्यात लिहिलंय की, “ही तरुण मुले लक्ष वेधण्यासाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतात, हे पाहणे खूप वेदनादायक आहे; ज्याला ते “भौकाल” म्हणतात. माहितीनुसार हा अपघात वासद, गुजरात येथे घडला. दुर्दैवाने पाचपैकी चार जण मरण पावले असून चालक सध्या गंभीर जखमी झाला आहे. चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

हेही वाचा: लग्नाच्या वरातीत ढोलवादकाचे अश्लील कृत्य; महिलेच्या कंबरेला पकडलं अन्… VIDEO पाहून नेटकरी संतापले

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत, ज्यात एकाने लिहिलंय की, “आजकालची मुलं सोशल मीडियामुळे स्वतःचा जीव धोक्यात टाकत आहेत.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “या मुलांनी सिट बेल्टदेखील घातलेला नाही.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “अजून म्हणा गाणी”, तर आणखी एकाने लिहिलंय, “या व्हिडीओत मी तेव्हाच घाबरलो, जेव्हा बाजूने ट्रक जात होता.”