Viral Video: लोक आपल्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या घट्ट मैत्रीचे नेहमीच गोडवे गाताना दिसतात. खरी मैत्री आणि त्या मैत्रीतील प्रेम, काळजी, नि:स्वार्थी भावना या सगळ्याचेच लोकांना कौतुक असते. पण, अशी निखळ मैत्री फक्त माणसांमध्येच नाही, तर प्राण्यांमध्येही पाहायला मिळते. प्राण्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से, अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. त्यावर लाखो व्ह्युज आणि कमेंट्सही येतात. सध्या एका शेतातील गाय आणि नाग यांच्या खास बॉण्डिंगचा व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर कधी कुत्रा आणि माकड, तर कधी कुत्रा आणि मांजर यांच्या मैत्रीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच. त्यात कधी हे प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात; तर कधी एकमेकांना मदत करताना दिसतात. नुकत्याच समोर आलेल्या या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून नेटकरीही कौतुक करताना दिसत आहेत.

cow hitting a child
‘कशाला विषाची परीक्षा घ्यायची…’ गाईनं चिमुकलीला धडक मारून केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरी संतप्त
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
tiger's Viral Video
‘शिकार करो या शिकार बनो’, बैलाची शिकार करण्यासाठी वाघाचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Akola man plucked the dead peacock feathers from the Road and took them Home the video w
VIDEO: “देवा सुंदर जगामंदी का रं माणूस घडविलास” मृत्यूनंतरही यातना संपेना..लोकांनी मेलेल्या मोराबरोबर काय केलं पाहा
Viral video of bus stopped with passengers en route to watch the bailgada sharyat watch video
VIDEO: नाद पाहिजे ओ, नादाशिवाय काय हाय; बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी भररस्त्यात थांबवली एसटी; शेवटी काय झालं पाहाच
Farmer desi jugaad video farmer jugaad to protect maize field from pig goes viral watch video
शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाय; डुक्करांपासून संरक्षण करण्यासाठी ढासू जुगाड; Video एकदा पाहाच
Tadoba Andhari Tiger Reserve, Chhota Matka, tiger
Video : ताडोबातील ‘छोटा मटका’ झाडांवर नखाने ओरबाडत होता अन्…
mother and children love
‘माझ्या आईसारखे शूर जगात कोणी नाही…’ लेकराला वाचविण्यासाठी सिंहाबरोबर केला सामना; थरारक VIDEO पाहून फुटेल घाम

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शेतामध्ये एक गाय उभी असून, तिच्यासमोर फणा काढलेला नाग दिसत आहे. नागाला पाहून गाय नागाला तिच्या जिभेने चाटून कुरवाळते. नागदेखील गाईच्या या कृतीवर न चिडता, तिथेच थांबून राहतो. गाय आणि नागामधील हे खास बॉण्डिंग पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @akilesh_1702 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओखाली, “अरे व्वा! याहून सुंदर काय असू शकतं,” असं लिहिण्यात आलं आहे.

हेही वाचा: ‘परिस्थिती कष्ट करायला भाग पाडते…’ यात्रेतील पाळण्यात चिमुकला करतोय जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओवर कमेंट्स करीत एका युजरनं लिहिलंय, “शेतकऱ्याचा पोरासाठी गाय, बैल हा काळजाचा विषय आहे.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “छान बाळ आहे.” आणखी एकानं लिहिलंय, “मुक्या प्राण्यांना जीव अशा प्रकारे लावला जातो.” आणखी एकानं लिहिलंय, “मीपण लहान असताना माझ्या गाईचे पाय दाबायचो. खूप खूश असायचो.”