Video: सूर्यवंशी चित्रपटाच्यादरम्यान सिनेमागृहात रोमँटिक सीन पाहून त्याने केलं ‘असं’ काही की…

त्याच्या या कृत्यानंतर सिनेमागृहात उपस्थितीत लोकांनी त्याची धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

man got beating
व्हायरल व्हिडीओ ( फोटो: Collection Tag / YouTube )

कोणत्याही चित्रपटातील रोमँटिक दृश्य विशेषत: सिनेमा हॉलमध्ये पाहताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. शनिवारी रात्री उशिरा अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या सूर्यवंशी या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान भोपाल येथील संगम सिनेप्लेक्समध्ये एका तरुणाने एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

काय झालं नक्की?

या घटनेचा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. महिला आणि प्रेक्षकांनी मारहाण केल्यानंतर तरुणाने माफी मागितल्याने पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तरुण महिलेच्या अगदी पुढे बसल्याचे सूत्रांनी सांगितले. चित्रपटाचा रोमँटिक सीन दाखवला जात असताना, तरुण मागे वळला आणि अश्लील टिप्पणी केली. महिलेने प्रथम दुर्लक्ष केले, परंतु तरुणाने तिचा विनयभंग सुरूच ठेवले, त्यावर तिने आक्षेप घेतला.

( हे ही वाचा: Viral: कागदाच्या तुकड्याकडे पाहत असलेल्या धोनी, रवी शास्त्री आणि हार्दिकच्या फोटोवर मिम्सचा पाऊस! )

महिलेच्या आक्षेपानंतरही तो तरुण कमेंट करत राहिला. ती महिला आपल्या जागेवरून उठली आणि चप्पलने तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलांसह इतर प्रेक्षक पीडित महिलेसोबत आले आणि त्यांनी तरुणाला मारहाण केली, ज्याला नंतर सभागृहातून हाकलून देण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video after watching a romantic scene in a cinema during the movie suryavanshi he did something like ttg

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news