Viral Video: या जगातील अनेक गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडील असतात. सोशल मीडियामुळे जगातील अनेक नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा या व्हिडीओंमध्ये प्राण्यांच्या जगण्याची पद्धत, शिकारीची पद्धत शिवाय इतर विविध गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.

आजवर तुम्ही अनेक व्हिडीओंमध्ये वाघ, बिबट्या, सिंह या हिंस्र प्राण्यांना इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल. हे प्राणी आपली भूक भागवण्यासाठी इतर प्राण्यांच्या कळपांवरही हल्ला करतात. या हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचावा असं वाटतं, त्यामुळे तोदेखील जीवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते, तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक वाघ रानगव्याच्या कळपावर हल्ला करताना दिसतोय.

Tigress falls into well while chasing wild boar
Video : रानडुकराचा पाठलाग करताना वाघीण पडली विहिरीत…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Tiger cub and wild boar fall into same well after chase goes wrong in MadhyaPradesh's Seoni shocking video
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा” वाघावर काय वेळ आली पाहाच; VIDEO व्हायरल
विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral
tiger poaching nagpur news in marathi
Tiger Poaching : वाघाच्या शिकारीतून कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार, डब्ल्यूसीसीबीचा ‘रेड अलर्ट’
Bhandara, woman deadbody , tiger attack, tiger ,
भंडारा : वाघाच्या हल्ल्यात ठार महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास संतप्त ग्रामस्थांचा नकार, पोलीस ठाण्यात…
Shocking video Sheep Killed A Leopard On Snow Mountain Animal Video goes Viral on social media
शिकारीच झाला शिकार! मेंढीनं केली खतरनाक बिबट्याची शिकार, मरता मरता ५ सेकंदात फिरवला गेम; Video पाहून अंगावर येईल काटा
Cowherd died , tiger attack, Chandrapur,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये रानगव्यांचा कळप चारा खात असून यावेळी अचानक तिथे वाघ येतो आणि त्या कळपावर झडप घालतो. पण, यावेळी वाघ आलेला पाहून रानगव्यांचा कळप जीवाच्या आकांताने पळत सुटतो, त्यामुळे वाघाच्या हातातून त्याची शिकार निसटते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

हेही वाचा: ‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @DivineWildlife2882 या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘जंगली गवा’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘खूपच थरारक’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘वाघ खूप भयानक प्राणी आहे’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘वाघाचं दुसरं नाव मरण आहे.’

Story img Loader