Viral Video Ambulance driver in Odisha offers drink to patient on way to hospital: ओदिशामधील एका रुग्णवाहिका चालकाने जखमी रुग्ण गाडीमध्ये असताना ती थांबवून रुग्णाला दारु ‘ऑफर’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे जखमी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी गाडी बाजूला घेऊन या रुग्णाला दारुचं ग्लास भरुन देतानाच या चालकाने स्वत:साठीही दारुचं ग्लास भरलं. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. हा चालक दोन ग्लासांमध्ये दारुसारखं दिसणारं पेय ओतत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

तिरतोल येथे या रुग्णवाहिका चालकाने गाडी महामार्गाच्या बाजूला पार्क केली. त्यानंतर त्याने स्वत:साठी आणि रुग्णवाहिकेमध्ये मागील बाजूस जखमी अवस्थेत असलेल्या रुग्णासाठी दोन ग्लास तयार केले. त्यानंतर हा चालक हे त्या ग्लासमधून दारु पीत असताना दिसत आहे. नंतर रुग्णवाहिकेमध्ये मागील बाजूच स्ट्रेचरवर असलेला रुग्ण आडवा पडूनच ग्लासातील दारु पिताना दिसत आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Rat case Sassoon hospital, Rat case,
ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरणात दोषी कोण? अखेर सत्य येणार बाहेर

हा सारा प्रकार सोमवारी घडला असून रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीने हा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर हा सारा प्रकार उजेडात आला. या व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने जेव्हा चालकाला जाब विचारला तेव्हा चालकाने रुग्णानेच दारुची मागणी केली होती असं सांगितलं. या रुग्णवाहिकेमध्ये रुग्णाबरोबर एक महिला आणि लहान मूलही दिसून येत आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…

जगतसिंहपूर जिल्ह्याचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. क्षेत्रबासी दास यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली. दिली. “ही खासगी रुग्णवाहिका असल्याने आम्ही याबद्दल फार काही होलू शकत नाही. मात्र या चालकाविरोधात आरटीओ आणि स्थानिक पोलिसांनी कारवाई केली पाहिजे,” असं दास म्हणाले.