scorecardresearch

Premium

“आमच्या पप्पांनी बुटांनी हाणला…” तरुणाचा मजेशीर Video पाहून तुम्ही पोट धरुन हसाल!

Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडीओ बघितले की, आपण स्वत: ला हसवल्याशिवाय राहू शकत नाहीत. सध्या असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल…

Viral Video
'आमच्या पप्पांनी बुटानी हाणला' सोशल मीडियावर व्हायरल (फोटो : युट्युबवरुन साभार)

Amchya Papani Butani Hanala Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्याच्या युगात सोशल मीडियावर टाकलेला व्हिडिओ, फोटो काही सेकंदात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचतो. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर रातोरात संबंधित कलाकार सेलिब्रिटी बनतो. गणपती उत्सव सुरू होण्याच्या अगोदर ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. बीड जिल्ह्यातील परळीच्या साईराज केंद्रे याने या गाण्यावर एक रील केला होता. त्यानंतर हे गाणं आणि त्याचं रील तुफान व्हायरल झालं. ज्याच्या त्याच्या मोबाईलवर सध्या हेच गाणं आता वाजतंय. नेटकऱ्यांकडून या गाण्याला चांगलीच पसंती मिळत आहे. तर आता या गाण्यानंतर ‘आमच्या पप्पांनी बुटांनी हाणला’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्ध होणाऱ्यांची संख्या फार आहे. आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमुळे तो रातोरात स्टार झाला. यातच आता गणेशोत्सव सुरु असताना सोलापुरात राहणाऱ्या आकाश चव्हाण नावाच्या तरुणाने गायलेले ‘आमच्या पप्पांनी बुटांनी हाणला’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने हा व्हिडिओ @RATHOD FILMS PRODUCTION या YouTube अकाउंटवर पोस्ट केला आहे.

mukesh ambani troll
मुकेश अंबानी सोशल मीडियावर झाले ट्रोल! लालबागच्या राजाचं दर्शन घेतानाचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
dance video
चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही पडाल चिमुकलीच्या प्रेमात, व्हिडीओ एकदा पाहाच…
Golden Retriever Exercise Video
मालकीण करेल तसा व्यायाम करतोय कुत्रा, दोघांचा क्यूट व्हिडीओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
amazing optical illusion
दिसतं तसं नसतं…! ऑप्टिकल इल्यूजन पाहून नेटकरी झाले थक्क, व्हायरल VIDEO पाहिल्यानंतर चक्रावून जाईल तुमचंही डोकं

(हे ही वाचा : “आमच्या पप्पांनी गणपती आणला…” बाळाच्या फोटोशुटसाठी पप्पांची धडपड, VIDEO होतोय तुफान व्हायरल )

येथे पाहा व्हिडिओ

साईराजच्या ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं चांगलंच व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब तसेच व्हाट्सअॅपवर या रील ने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. ‘टुकू मुकु बघतोय चांगला’ या ओळीवर त्याने दिलेले गोड एक्स्प्रेशन पाहून लाखो जण हा रील पुन्हा पुन्हा बघत आहेत. यातच आता ‘आमच्या पप्पांनी बुटांनी हाणला’ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे गाणं ऐकून तुम्ही पण पोट धरून हसाल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video amchya papani butani hanala song viral on social media akash chavan has sung this song pdb

First published on: 27-09-2023 at 17:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×