VIRAL VIDEO : बापरे! दिवसाढवळ्या रस्ता ओलांडताना दिसला हा भलामोठा ॲनाकोंडा…

अ‍ॅनाकोंडा चित्रपट तुम्ही कधीतरी पाहिला असेलच. त्यातील भलामोठा अ‍ॅनाकोंडा आणि थरकाप उडवून देणाऱ्या त्याच्या हालचाली पाहून अक्षरशः प्रत्येकाचाच थरकाप उडतो. अगदी असाच अनुभव देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय.

anaconda-on-highway-viral-video
(Photo: Instagram/ snake.wild)

ॲनाकोंडा चित्रपट तुम्ही कधीतरी पाहिला असेलच. त्यातील भलामोठा ॲनाकोंडा आणि थरकाप उडवून देणाऱ्या त्याच्या हालचाली पाहून अक्षरशः प्रत्येकाचाच थरकाप उडतो. केवळ स्क्रिनवर असा राक्षसी ॲनाकोंडा जर आपली अशी अवस्था होत असेल तर मग विचार करा जर असाच राक्षसी ॲनाकोंडा प्रत्यक्षात तुमच्या समोर आला तर… अगदी छोटे मोठे साप जरी दिसले तरी आपली बोबडी वळते, मग चित्रपटात दाखवलाय अगदी तसाच भलामोठा ॲनाकोंडा तुमच्या बाजुने सरपटत आला तर काय होईल? होय, अगदी असाच भलामोठा ॲनाकोंडा दिवसाढवळ्या एका हायवेवरून रस्ता ओलांडताना दिसून आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा सुद्धा थरकाप उडेल, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, सुमारे २५ फूट लांब दिसणारा एक हिरवा ॲनाकोंडा हायवेच्या मध्यभागी दुभाजकावरून सरपडत असताना दिसून येतोय. या ॲनाकोंडाचे अवसान दातखिळी बसेल असं होत. भल्या मोठ्या या ॲनाकोंडाजवळ जाण्याची हिम्मत कोणी करत नव्हतं. हायवेवरून जाणाऱ्या सर्व गाड्या या ॲनाकोंडाला पाहून जागीच थांबल्या. इतकंच नव्हे तर गाड्यांमधल्या लोकांनी याची देही याची डोळा भला मोठा ॲनाकोंडा पाहण्यासाठी तौबा गर्दी केली होती. अनेकांनी या ॲनाकोंडाचा आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यास सुरूवात केली.

हा ॲनाकोंडा शांतपणे हायवेवरील रस्ता ओलांडत बाजुला असलेल्या दलदलीच्या भागात जाताना दिसला. या भल्यामोठ्या ॲनाकोंडाला पाहून लोकांनी घाबरून न जाता शांतपणे त्याला रस्ता ओलांडण्यासाठी मदत केली. हा इतका मोठा ॲनाकोंडा दुभाजकावरून दुसऱ्या रस्त्यावर येत असताना तिथे उभा असलेल्या एका माणसालाच्या अगदी जवळून जाताना दिसला, पण या ॲनाकोंडाने चित्रपटात दाखवतात तसा कोणावरही हल्ला केला नाही, याचं सर्वांना आश्चर्य वाटतंय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवऱ्यापासून लपवून Amazon वर केली शॉपिंग, डिलिव्हरी ड्रायव्हरने पॅकेज लपवलं सुद्धा, पण पुढे जे झालं ते पाहाच….

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : असा केक तुम्ही कधी पाहिला नसेल, पण नवरा नवरीच्या समोरच पडला त्यांचा स्पेशल Wedding Cake

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ही घटना ब्राझीलमध्ये घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘snake.wild’ नावाच्या युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ९४ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. इतक्या मोठ्या ॲनाकोंडाला पाहून लोक या व्हिडीओवर कमेंट्स सेक्शनमध्ये आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video anaconda on highway snake sanp azgar brazil instagram anaconda crossing road halts traffic snake video google trending video prp

ताज्या बातम्या