scorecardresearch

Viral Video: वाघाची जंगलात दमदार एन्ट्री, ‘झकास कॉन्फिडन्स’ म्हणत आनंद महिंद्राही झाले इम्प्रेस

viral video : आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनं लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकली, तुम्हीही पाहा हा व्हिडीओ.

tiger
वाघानं केली दमदार एन्ट्री (Photo =Twitter)

सोशल मीडियावर दर दिवशी प्राण्यांचे शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. महिंद्र ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्र ट्वीटरवर सतत सक्रीय असतात, आणि समाजातातील घडामोडींवर भाष्य करीत असतात.  ट्वीटरवर प्रेरणादायी व्हिडीओ पोस्ट करून लोकांमध्ये जगजागृती करण्याचा ते प्रयत्न करत असतात. वेगवेगळे व्हिडीओ ते आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. असाच एक नवा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वाघाची रुबाबात एन्ट्री –

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक वाघ जबरदस्त एन्ट्री करत आहे. त्याचा हा चालण्याचा रुबाब पाहून आनंद महिंद्राही आवाक झाले आहेत. सर्वात घातक व चाणाक्ष शिकारी कोण असा प्रश्न येताच डोक्यात आधी वाघाचं नाव आपसूकच येतं. अगदी सिंहाचा जंगलाचा राजा म्हणून ओळखलं जात असलं तरी वाघाची शक्तीही काही कमी म्हणता येणार नाही. म्हणूनच जंगलात शक्यतो सर्वच प्राणी वाघापासून आपला जीव वाचवण्यासाठी काहीसं अंतर राखून असतात. अवघ्या १५ सेकंदाच्या या व्हिडीओमधून वाघाचा रुबाब आपल्याला पाहयला मिळतो. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आनंद महिंद्रा म्हणात झकास कॉन्फिडन्स आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – शेवटी आई ती आईच..! पर्यटकांना दगड मारणाऱ्या चिपांझीला त्याच्याच आईनं बदडलं; Video पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्याय व्हिडीओला तील लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर नेटकरीही वाघाचा रुबाब पाहून चकित झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 16:06 IST

संबंधित बातम्या