Bears Fight Video: सोशल मीडियावर प्राण्यांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ भयानक असतात, जे पाहून लोकांच्या अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा प्रकार उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील असल्याचे सांगितले जात आहे. पिथौरागढ हा डोंगराळ भाग असून तिथे जंगलही आहे. येथे निसर्गाचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.
डोंगराळ आणि जंगल परिसर असल्यामुळे येथे जंगली प्राणीही दिसतात. अरुंद डोंगरी रस्त्यांवर अनेकदा धोकादायक जंगली प्राणी फिरताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात दोन हिमालयीन अस्वल एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ खूपच भयानक आणि भीती निर्माण करणारा आहे. एका व्यक्तीने कारमधून हा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोन्ही अस्वलांमध्ये जोरदार भांडण सुरू आहे. भांडता-भांडता ते कधी रस्त्याच्या मधोमध येतात, तर कधी बाजूला जातात. व्हिडीओ बनवणारी व्यक्ती कारच्या आत बसलेली होती. नाहीतर तिच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला असता.
हा व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. व्हिडीओ बनवणारी व्यक्ती सांगत आहे की, रात्री ८ ते ८.३० ची वेळ होती. हा एक सुनसान भाग आहे आणि येथे फार कमी गाड्या ये-जा करतात. असे दृश्य खूप क्वचित पाहायला मिळतात.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आयएफएस अधिकारी मोहन परगैयन यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, दोन हिमालयीन अस्वल एकमेकांशी भांडताना पाहणे हा एक अद्भुत अनुभव होता. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @LeslieVardha या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, सध्या तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “एकदम खतरनाक फाइट” तर दुसऱ्यानं “मी तर थांबलोच नसतो तिथे” अशी कमेंट केली. तर एका मुलीने कमेंट करत लिहिलं, “तुम्ही त्यांच्या जंगलात गेलात तर हे पाहायला मिळणारच आहे”
