Viral Video: सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात किंवा आपल्या घरामध्ये मिळालेल्या वेळेत डान्स करून आपली आवड पूर्ण करतात.

हल्ली सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर वेगवेगळी कला सादर करताना दिसतात, ज्यात डान्स करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. परंतु आजकाल काही लोक या कलेचा अपमान करताना दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी काही जण मुद्दाम अश्लील पद्धतीचे नृत्य करतात. पण आता असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील डान्स पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल.

सोशल मीडिया सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक काकू खूप भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला ‘नाच रे पतरकी’ या भोजपुरी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. या महिलेच्या हटके डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव अतिशय सुरेख आहेत. या महिलेचा हा डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. शिवाय अनेक नेटकरीही यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Sangita Mishra (@sangeeta_mishra05)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sangeeta_mishra05 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या असून यावर यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “काय नाचली रे ही“, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “काकू जरा हळू नाचा ना ”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “खूप भारी एनर्जी”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “काकू तुमचं वय काय?”