Viral Video: सोशल मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या अनेक अनोख्या आणि आश्चर्यकारक घटना काही क्षणांतच जगभरातील लोकांपर्यंत पोहोचतात. विविध देशांतील जंगलातील प्राणी, निसर्गाचे अद्भुत दृश्य, थरारक प्रसंग, अनोख्या कला तसेच लोकांच्या दैनंदिन जीवनातील खास क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. त्यामुळे एखाद्या दुर्गम भागात कॅमेऱ्यात कैद झालेला क्षणही काही वेळातच लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. विशेष म्हणजे अशा व्हिडीओंमुळे जगातील विविध ठिकाणचे जीवन, संस्कृती आणि निसर्ग जवळून पाहण्याची संधी नेटकऱ्यांना मिळते.
आज सोशल मीडियामुळे गृहिणींनाही आपली कला आणि कौशल्य जगासमोर मांडण्याचे मोठे व्यासपीठ मिळाले आहे. घरातील दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळतानाच अनेक महिला नृत्य, गायन, चित्रकला, हस्तकला, पाककला, मेहंदी अशा विविध कलांचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. पूर्वी केवळ कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींपुरती मर्यादित राहणारी त्यांची कला आता हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहे. अनेक गृहिणींच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या कौशल्याचे कौतुकही केले जात आहे. त्यामुळे घर आणि कुटुंब सांभाळतानाही आपली आवड आणि कला जोपासता येते, हे सोशल मीडियामुळे अनेक महिलांनी सिद्ध केले आहे.
हल्ली मराठी गाणीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत येताना दिसत आहेत. पारंपरिक मराठी गाण्यांपासून ते नव्या ट्रेंडिंग गाण्यांपर्यंत अनेक गाणी रिल्स आणि व्हिडीओच्या माध्यमातून लोकप्रिय होत आहेत. एखाद्या गाण्याची आकर्षक चाल, बोल किंवा ताल आवडला की नेटकरी त्यावर डान्स, अभिनय आणि विविध प्रकारचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करतात. त्यामुळे काही मराठी गाणी काही वेळातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्व वयोगटातील लोक या गाण्यांवर रिल्स बनवताना दिसत असून, सोशल मीडिया मराठी संगीताला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे.
सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला ‘अय सुंदरा’ या मराठी गाण्यावर सुंदर नृत्य करताना दिसत आहे. गाण्याच्या तालावर तिच्या भन्नाट डान्स स्टेप्स आणि उत्स्फूर्त हावभावांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. साध्या वातावरणात तिने केलेले हे मनमोकळे नृत्य सोशल मीडिया यूजर्सना चांगलेच आवडले असून, अनेकजण तिच्या डान्सचे कौतुक करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ashukharat_1203
या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “क्या बात है ताई.” एका युजरने लिहिलेय, “किती भारी नाचलीस गं” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक नंबर नाचलात ताई”
