Viral Video: सोशल मीडियामुळे आज अनेक व्हिडीओ काही क्षणांतच जगभरात व्हायरल होतात. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर दररोज नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. यामध्ये डान्स, गाणी, मजेशीर प्रसंग, प्राण्यांचे व्हिडीओ तसेच सामान्य लोकांच्या अनोख्या कलागुणांचे व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. काही व्हिडीओ त्यांच्या वेगळेपणामुळे चर्चेत येतात, तर काहींना नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. त्यामुळे सोशल मीडिया हे अनेकांसाठी आपली कला आणि कौशल्य जगासमोर मांडण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ अनेकदा एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. एखाद्या व्यक्तीतील कला, नृत्यकौशल्य किंवा एखादी अनोखी गोष्ट कॅमेऱ्यात कैद होते आणि काही क्षणांतच ती जगभरातील नेटकऱ्यांपर्यंत पोहोचते. यामुळे अनेक सामान्य व्यक्तींना रातोरात प्रसिद्धी मिळते. काहींना मनोरंजन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते, तर काहींच्या कलागुणांना मोठे व्यासपीठ मिळते. विशेष म्हणजे, यापूर्वी फारशा लोकांना माहीत नसलेल्या व्यक्तींचीही सोशल मीडियामुळे मोठी ओळख निर्माण होते. त्यामुळे एखादा व्हायरल व्हिडीओ केवळ मनोरंजनाचे साधन न राहता, काहींसाठी आयुष्याला नवी दिशा देणारा ठरू शकतो.

हल्ली अनेक गावांमध्ये विविध सण, उत्सव आणि इतर खास प्रसंगांनिमित्त सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये गावातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण उत्साहाने सहभागी होतात. विशेष म्हणजे, अशा कार्यक्रमांमधून अनेक गृहिणींनाही आपल्यातील कलागुण सादर करण्याची संधी मिळते. घर, संसार आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना अनेक महिलांमध्ये नृत्य, गायन तसेच इतर विविध कला दडलेल्या असतात. मात्र, दैनंदिन जबाबदाऱ्यांमुळे त्यांना आपली कला सादर करण्यासाठी पुरेसा वेळ किंवा व्यासपीठ मिळत नाही. गावातील सार्वजनिक कार्यक्रमांमुळे या महिलांना आपले कौशल्य दाखवता येते, तसेच उपस्थितांकडून कौतुकाची थापही मिळते. अशाच कार्यक्रमांतील काही क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात आणि त्यांना नेटकऱ्यांकडून मोठी पसंती मिळते.

नवरात्रीच्या काळात देशभरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. देवीच्या आराधनेसह अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये तरुणाईसोबतच महिलाही मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसतात. अशातच नवरात्रोत्सवादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही महिला नवरात्रोत्सव सुरू असलेल्या ठिकाणी एकत्र येऊन गरबा खेळताना दिसत आहेत. परंतु यावेळी एका महिलेच्या नृत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी ती महिला ‘बघ बघ आग सखे कसं गुबू गुबू वाजतय’ या गाण्यावर डान्स करतेय.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by TelicastTv (@telicast_tv)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @telicast_tv या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “आयुष्यात परत वन्स मोअर नसतो त्यामुळे जगण्याचा आंनद घेतला पाहिजे एका युजरने लिहिलेय, “कुणी काही बोलूद्या पण आपण सुट्टी द्यायची नाही मिळालं तिथे आनंद घायचा.” आणखी एका युजरने लिहिलेय, “काकूंचा धिंगाणा”