Viral Video: सोशल मीडियावर डान्स, गाणी, अभिनय करणाऱ्या अनेक कलाकारांचे रील्स व्हायरल होत असतात. त्यातील अनेक जण त्यांच्यातील कलेमुळे खूप चर्चेत येतात आणि प्रसिद्ध होतात. प्रसिद्धी मिळाली की, त्यांच्या कलेला खऱ्या अर्थाने वाव मिळतो. अगदी लहान चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचा यात समावेश असतो. सध्या यावर एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
महिलांचा आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच काही महिला आहेत, ज्या ‘पियर फराक वाली’ या भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यातील एकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक लग्नाच्या वरातीमध्ये नाचत असून यावेळी ‘पियर फराक वाली’ हे गाणं लागतं. त्यावेळी त्यातील एक महिला हटके डान्स आणि एक्स्प्रेशन्स देत नाचायला सुरुवात करते. तिच्या त्या डान्स स्टेप्स पाहून आसपासचे इतर लोक तिच्याकडे कौतुकाने पाहतात. तिचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dipesh5923 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला आतापर्यंत तीन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “काकी, तुम्ही कमाल आहात”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “मला अशी सासू पाहिजे”. तिसऱ्या युजरने लिहिलेय, “काकू, खरंच भारी नाचताय”. आणखी एकाने लिहिलेय, “छान नाचताय”.