Viral Video: महिलांचा आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका महिला डान्स करताना दिसतेय. यावेळी ती एका भोजपुरी गाण्यावर डान्स करत आहे. तिने डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.

हल्ली आपली कला सादर करण्यासाठी लोक सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. डान्स, गाणी, अभिनय, पेंटिंग, रेसिपी, कविता अशा विविध कलाकृती लोक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून जगासमोर आणतात. त्यातील काही लोकांचे व्हिडीओ जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचतात ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळतो. सध्या अशाच एका महिलेचा डान्स सोशल मीडियावर इतका व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून या काळात लग्नातील विविध कार्यक्रमादरम्यानचे अनेक सुंदर व्हिडीओ समोर येतात. ज्यात कधी मेहंदी, हळद, लग्न किंवा संगीत या कार्यक्रमांमध्ये लोक नाचताना किंवा गाणी गाताना दिसतात. सध्या एका मेहंदीच्या कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आलाय ज्यात एक महिला बेभान होऊन नाचताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला मेहंदीच्या कार्यक्रमात एका भोजपुरी गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसतेय. यावेळी ती करत असलेला डान्स आणि चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधत आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sangeeta_mishra05 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

एका युजरने लिहिलेय, “आई गं क्या बात है” एका युजरने लिहिलेय, “काकू तुम्ही तर कमाल केली” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला बोलतात डान्स”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “एक नंबर डान्स”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “काकू जरा हळू नाचा”