Viral Video: नुकत्याच काही दिवसांपूर्वी धुलिवंदन पार पडलं. धुलिवंदनानिमित्त अनेकांचे मित्रपरिवारासोबत रंग खेळतानाचे, गाणी म्हणतानाचे आणि ठेका धरून नाचतानाचे असंख्य व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून आहे. ज्याच एक महिला धुलिवंदनाच्या कार्यक्रमाममध्ये जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.

समाज माध्यमांवर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं.

या सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला “चोली के पीछे क्या है” या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावेळी ती करत असलेल्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तिचा डान्स सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Suvarna Kale (@suvarnakale333)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @suvarnakale333 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “कसली भारी नाचलीस” दुसऱ्याने लिहिलेय, “काटा कीर्र नाचली राव.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “गावरान तडका राव.”, तर आणखी एकाने लिहिलंय, “हिचा डान्स नादखुळा आहे”