Viral Video: सोशल मीडियावर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका महिलेचा एका कार्यक्रमातील डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. आता अशाच एका कार्यक्रमातील एका महिलेचा डान्स व्हायरल होतोय ज्यामध्ये ती सुंदर डान्स करताना दिसतेय.

हल्ली सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका डान्स कार्यक्रमातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक महिला खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या कार्यक्रमामध्ये एक महिला स्टेजवर जाऊन सर्वांसमोर “दो धारी तलवार” या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. तिचा डान्स पाहून आसपास जमलेल्या महिला तिला अजून प्रोत्साहन देतात. शिवाय सोशल मीडियावरही तिच्या डान्सचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Mehak Rathj (@mehakrathi5)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mehakrathi5 या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “काकू तुमच्या डान्समुळे स्टेजवर वादळ आलं”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “काकू जरा हळू”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “व्वा सुंदर नाचल्या काकी”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “काकू तुम्ही तर लयभारी”, तर आणखी एक व्यक्तीने लिहिलंय की, “यांचा डान्स पाहून हसू की रडू असं झालं” तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूप मस्त केला तुम्ही ताई”