Viral Video: अनेक महिला घरातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच आपल्या नृत्याची आवडही जपताना दिसतात. दैनंदिन कामातून वेळ काढून त्या विविध गाण्यांवर डान्सचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करतात. या माध्यमामुळे त्यांच्या कलेला मोठे व्यासपीठ मिळाले असून लाखो प्रेक्षकांपर्यंत त्यांचे सादरीकरण पोहोचत आहे. अनेक महिलांनी आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे, तर काहींना मनोरंजन क्षेत्रातील संधी आणि उत्पन्नाचे नवे मार्गही उपलब्ध झाले आहेत. सोशल मीडियामुळे घर आणि आवड यांचा समतोल साधत स्वतःची कला आत्मविश्वासाने जगासमोर मांडण्याची संधी अनेक महिलांना मिळत आहे.

सोशल मीडियामुळे डान्स व्हिडिओ हे केवळ मनोरंजनाचे माध्यम राहिले नसून अनेकांसाठी उत्पन्नाचेही साधन बनले आहे. सातत्याने दर्जेदार आणि आकर्षक नृत्याचे व्हिडिओ शेअर करणाऱ्या काही कंटेंट क्रिएटर्सना मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स मिळतात. त्यानंतर जाहिराती, ब्रँड प्रमोशन, पेड कोलॅबोरेशन, लाईव्ह इव्हेंट्स आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कमाईच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आवड पूर्ण सोबतच पैसेही मिळतात, त्यामुळे हल्ली अनेकजण सोशल मीडियावर आपली कला सादर करताना दिसतात.

सोशल मीडियामुळे नृत्यकलेला मोठे व्यासपीठ मिळाले आहे. आज लहान मुलांपासून तरुण, ज्येष्ठ नागरिक, तसेच ग्रामीण भागातील कलाकारही आपल्या नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आकर्षक स्टेप्स, लोकप्रिय गाणी आणि सर्जनशील सादरीकरणामुळे अनेक डान्स व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल होतात. अशा व्हिडिओंमुळे अनेक कलाकारांना व्यापक ओळख मिळते, काहींना मनोरंजन क्षेत्रात संधीही मिळते.

‘डोंगराचे अरुण एकबाई चांद उगवला’ या गाण्यावर काकूंचा भन्नाट डान्स सध्या लक्ष वेधून घेत आहे. एका डान्स क्लासमध्ये काकू उत्साहाने नृत्य करताना दिसत असून, त्यांच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या महिला त्यांच्याकडे कौतुकाने पाहात आहेत. नृत्याची आवड जपत या महिला मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. त्यांच्या उत्साहाचा आणि डान्समधील आत्मविश्वासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by gargi dancer???? (@gargi_pathare.927)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @gargi_pathare.927 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “ताई खूपच भारी नाचलात” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स काकू” आणखी एका युजरने लिहिलेय, “काकू, तुम्ही तर कमाल…”