Viral Video: हल्ली सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होताना दिसतात. एखादा मजेशीर प्रसंग, अनोखी घटना, डान्स, प्राण्यांचा व्हिडीओ किंवा थक्क करणारा क्षण पाहता पाहता लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. व्हिडीओला मिळणारे लाइक्स, कमेंट्स आणि शेअर्स यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढते. त्यामुळे सोशल मीडिया हे मनोरंजनासोबतच एखादी घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे.

हल्ली सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या भन्नाट कल्पना करताना दिसतात. काही जण तर व्ह्यूज आणि लाइक्स मिळवण्यासाठी थेट रस्त्यावरच डान्सचे व्हिडीओ शूट करतात. आजूबाजूला लोकांची गर्दी असतानाही कॅमेऱ्यासमोर बेधडक डान्स करण्याचा त्यांचा उत्साह पाहायला मिळतो. अशा व्हिडीओंना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाल्यास ते काही वेळातच व्हायरल होतात. त्यामुळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोशल मीडियावर नवनवीन प्रयोग करण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे.

अनेक गृहिणींसाठी सोशल मीडिया हे घरातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच आपली कला आणि कौशल्य जगासमोर मांडण्याचे प्रभावी साधन बनले आहे. स्वयंपाक, डान्स, गायन, चित्रकला, हस्तकला अशा विविध कलांचे व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या कलागुणांना प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद त्यांचा आत्मविश्वास वाढवतो. काही गृहिणींना याच माध्यमातून चांगली ओळख आणि प्रसिद्धीही मिळते. त्यामुळे घराच्या चौकटीत राहूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी सोशल मीडियामुळे मिळत आहे.

ठाण्याच्या तलाव पाळीच्या निसर्गरम्य परिसरात एका महिलेचा डान्स व्हिडीओ सध्या लक्ष वेधून घेत आहे. या महिलेने ‘एक दो तीन’ या लोकप्रिय गाण्यावर उत्साहात डान्स केला आहे. तलावाच्या सुंदर परिसरात तिच्या डान्सच्या स्टेप्स पाहायला मिळत आहेत. तिच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटकरी तिच्या उत्साहाचे आणि डान्सचे कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Paahi❤️ (@official.paahi)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official.paahi या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “ताई तुम्ही ठाण्याच्या तलाव पाळीजवळ आहात” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स ताई.” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय सुंदर नाचलीस गं”