Viral Video: समाजमाध्यमांवर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल पण या महिलेच्या डान्सने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.

खेड्यातील अनेक महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतं. यापलीकडे जाऊन त्यांना स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी फार कमी मिळतो. पण, त्यातूनही हल्ली सोशल मीडियामुळे अनेक हौशी महिला आपल्यातील कला न घाबरता सादर करू लागल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय. ज्यात ती चक्क डोक्यावर कढई घेऊन नाचताना दिसतेय.

सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला ‘सावन में मोरनी बनके ’ या हिंदी गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील पाहण्यासारखे आहेत. तिचा हा डान्स पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करून तिचं कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dipikasen557 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या असून, अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “काकू तुम्ही तर कमाल केली”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “ही खरी कलाकार”, तर आणखी एकानं लिहिलंय, “आई गं किती सुंदर”.